लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
February 21, 2025 at 11:42 AM
*#लैंगिक_आरोग्य भाग-3*
https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t
#फोरप्ले
काही दिवसांपूर्वी एका फेसबुक फ्रेंडची एक कॉमिक पोस्ट होती .ती म्हणते Good morning darling आणि त्यावर तो म्हणतो पटकन चहा टाक.
Exactly हेच होतं . तिचे इशारे, नखरे,नकळत स्पर्श करणे,मुरके घेणे,मुद्दाम वेगळ्या हालचाली याच्या गावी पण नसतात.
स्त्रीला हव्या असणाऱ्या गोष्टी खुप छोट्या आणि सोप्या पण असतात. प्रचंड महागडे गिफ्ट आणि शॉपिंग,हॉटेलिंग हेच तिला खुश ठेवते हा एक गैरसमज.
खुप पुरुषांना असे वाटते की सेक्स च्या आधी केलेली मिठ्या,किस आणि दाबादाबी म्हणजेच फोर प्ले ,पण फोर प्ले त्याच्या खुप आधीपासुन सुरु होणारी गोष्ट आहे. त्याची सुरुवात शरीरापासून नाही तर मनापासून झाली पाहिजे.मी काही उदाहरण देते.
1. माझ्या एका मित्राने सांगितले बायको आणि तो गाडीवर जात असताना अचानक त्याने गाडी थांबवली बाभळीच्या झाडाखाली आणि गप्पा मारत मारत त्या बाभळीच्या शेंगा तिच्या पायात पैंजणा प्रमाणे बांधल्या,त्याचा छान खुळ खुळ आवाज आला.
2. आम्ही मित्र मैत्रिणी बाहेर जेवायला गेलो होतो .मी घास घेणार तेवढ्यात माझा मित्र म्हणाला थांब ,अगदी जशी आहेस तशी . मी थांबले पण नेमके काय झाले ते विचारले कारण त्याला फोटो पण नव्हता काढायचा.त्याला पहायचे होते माझे हेलकावे घेणारे कानातले मंत्रमुग्ध होऊन .
मागे एकदा एका मित्राकडे गेले होते .त्याचे पुस्तक प्रकाशन होते म्हणून . रात्रभर प्रवास करून सकाळी पोहोचले .त्याच्या घरात प्रवेश केला आणि जागीच थबकले .त्याची बायको नुकतीच न्हाऊन आलेली असावी केस टॉवेल मध्ये बांधले होते .मंद सुगंध येत होता . किचन ओट्यावर पाठमोरी काहीतरी काम करत होती .एवढी आकर्षक वाटत होती .अशी स्त्री/बायको /प्रेयसी बघून मागून मिठी मारण्याचा मोह झाला नाही तर त्याच्या सारखा अरसिक तोच.
न्हाउन आलेल्या बायकोच्या केसांचा वास घ्या, ती स्वयंपाक करत असताना तिच्या हालचाली पहा,ती मस्त ड्रेसिंग टेबल जवळ तयार होत असताना तिच्या हालचाली डोळ्यांत साठवा, अचानक तिच्या केसात फूल किंवा गजरा माळा,रोज एक तरी घास स्वतःच्या हाताने भरवा . नास्तिक असलात तरी तिच्या सोबत हाताला हात लावून पुजेला जवळ बसा.शालू मधील तिचा गंध अनुभवा (नक्की काय आठवते पहा) .असा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद तिला द्या आणि मग प्रणया मधला तिचा भरभरुन मिळालेला प्रतिसाद
अनुभवा.
आपला नवरा/बॉयफ्रेंड अंघोळी वरुन येवून भांग पाडत असताना .हळूच जावून मागून मिठी मारू हलकासा किस घेवुन या.
जेवताना किंवा काही मिठाई वगैरे खाताना त्याला हळूच एक घास भरवा.घरातल्यांची नजर चुकवून हलकासा चिमटा घ्या.मंद म्यूजिक लावून,कधी फुलांचा वापर करून वातावरण निर्मिती करा.
कित्येक वेळा स्त्रिया अगदी लहान सहान गोष्टींवरून चिडचिड करत असतात .घरातील कुरबुरी बेडटाईम मध्ये डिस्कस करायची सवय पार्टनरचा मुड घालवणारी आहे .
पुढाकार स्त्रियांनी पण घ्यायला हवा कित्येकदा घरात कमावती व्यक्ती पुरुष असते किंवा दोघे कमावते असले तरी खूप क्वचित ठिकाणी दोघे कारभार करतात . अन्यथा हा भर पुरुषांवर असतो .त्यामुळे तो तणावात असेल तर तुमची लडिवाळ छेडछाड त्याचा ताण हलका करतो .
मी हे फक्त उदाहरण दिलेत .तुम्ही तुमची कल्पकता वापरा.इंटरकोर्स मनासारखा धुंद हवा असेल तर फोरप्ले स्किप करू नका.
त्यातल्या त्यात स्त्रीची तयारी तिचं मन प्रफुल्लित करण्यापासुन करायची असते.नाहीतर तो सेक्स तिच्या मनापर्यन्त पोहोचत नाही आणि ती सतत अतृप्ती अनुभवते. एक प्रकारचा दुरावा तिचा जोडीदारा सोबत निर्माण होतो.जो ना तिला कुठे शेअर करता येतो न तुम्हाला.अन्यथा एका उशी सोबत किंवा बाहुलीसोबत सेक्स केल्यासारखे तुम्हाला वाटेल.
©️ #प्राजक्ता_पाटील

👍
❤️
👌
🙏
🍬
😘
47