लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
February 23, 2025 at 09:33 AM
*#लैंगिक_आरोग्य भाग-4*
*#personal_hygiene_and_sexual_life*
*(वैयक्तिक स्वच्छता आणि लैंगिक जीवन)*
https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t
इंग्रजीत टायटल दिलं की कसं भारी वाटतं.
“पहाटे पहाटे मला जाग आली...” सुंदर गाणं. विशालने जेंव्हा नीलमला पहाटे जवळ घेतले. तोंडाचा भपकारा आला आणि रोमॅंटिक मुड पार निघुन गेला.
मीरा आणि मितेश हे नवविवाहित जोडपे हनिमूनला गेले. खुप आनंदात असलेली मीरा मात्र तिथे हिरमुसली . मितेशच्या अंगाला एक उग्र दर्प येत होता. ज्यामुळे तिला त्याच्या जवळ ही जाऊ वाटत नव्हते आणि त्याला स्पष्टपणे सांगता ही येत नव्हते.
सोनल घरकामात एकदम चटपटीत ,बोलण्यातही तशीच पण या कामात तिचं स्वतःकडे लक्ष नसायचं . तो घट्ट आणि दिवसभर घामाने भिजलेला ब्लाउजच बेडरूम मध्ये पण असायचा हळू हळू तिचा नवरा सुजित सेक्स टाळू लागला.
मितालीला स्वच्छता न बाळगल्यामुळे योनीमार्गात नेहमी फंगलइन्फेक्शन व्हायचे त्यामुळे तिच्या पार्टनरला व्हायचे आणि मग दोघांना ही खाज सुटून त्यांचे सेक्स लाइफ डिस्टर्ब व्हायचे.
रितेश बरोबर नेहा डेटवर गेली खरं पण त्या दोघांना ही तिथे त्रास झाला रितेशला स्वच्छतेची व्यवस्थित शिकवण लहानपणा पासुन नव्हती त्यामुळे त्याच्या शिश्न मुंडावर बारीक खडे तयार झाले होते आणि त्याचा उग्र वास येत होता. शिवाय त्याला सेक्स करताना दुःखत होतं.
वरील उदाहरणांमधुन लक्षात येईल तुम्ही फक्त रोमॅंटिक आणि सेक्स मधील माहितीगार असणे एवढेच महत्वाचे नाही तर वैयक्तिक स्वच्छता पण महत्वाची.
#काय_दक्षता_घ्याल
1.दिवसभर वापरलेले कपडे बेडरूम मध्ये वापरु नका. साधाच पण वेगळा पोशाख ठेवा.
2. शक्यतो संध्याकाळी पण अंघोळ करा.कित्येकदा दिवसभर अंगमेहनतीचे काम किंवा प्रवासातील दगदग यामुळे घाम आणि अंगाला वास येत असतो.
3. बेड वर जाण्यापुर्वी ब्रश करा.
4. इनर गारमेंट्स संध्याकाळी बदलत जा , जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही.
5. आपल्या अंगाला दुर्गंधी येत असेल तर कारण शोधुन उपाय करा.
6. सिगारेट,तंबाखू,गुटखा याचा वास पार्टनरला सहन होइलच असे नाही.
7. सुगंधी वस्तु पण योग्य प्रमाणात वापरा. अति उग्र होतात
8.सगळ्यात महत्वाचे तुमच्या जननेंद्रियांची स्वच्छता.
9.वेळचेवेळी हेअर रीमुव्ह करावेत .
एरवी तर स्वच्छता असावीच पण इंटरकोर्स पुर्वी स्वच्छ करून घ्यावे.
#परिणाम
1.स्वच्छते अभावी तुम्हाला तर इंफेक्शन होइलच पण पार्टनरला पण होण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात तरूण असताना हे सहन होईल वाढत्या वयात शरीर थोड़े कमकुवत झालेले असते किंवा मधुमेह किंवा इतर अजार असतील तर फार पटकन इंफेक्शन होते.
2.स्वच्छते अभावी गजकर्ण सारखे पण अजार जननेन्द्रिया जवळ होतात.
3. स्वच्छता नसेल तर पर्टनरला किळस वाटेल,त्यातही ओरल करायची कित्येकांची इच्छा असते. तुमची अस्वच्छता आणि वरुन जबरदस्ती तर पार्टनर तुमचा तिरस्कार करेल आणि साधा इंटरकोर्स पण घडून येणार नाही.
4.कित्येक प्रकारचे कॅन्सर स्त्रियांना जननेन्द्रियाच्या स्वच्छतेचा आभाव आणि किरकोळ आजार उदा.योनीमार्गातून येणारा दुर्गंधीयुक्त पांढरा स्त्राव .यांच्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर,तर स्तनाचा कॅन्सर दुधाच्या योग्य वेळी निचरा न झाल्यामुळे.पण साधी स्तनांची मालिश करणे किंवा हात लावून पहाणे हे आज ही कित्येक स्त्रियांना लाजिरवाणे वाटते.
वैयक्तिक स्वच्छता योग्य प्रकारे कशी ठेवावी हे खरे तर लहान वयापासूनच शिकवायला हवे.
आपण उटणे लावून अभ्यंग स्नान , केस धुणे आठवड्यातून 2/3 तरी करायला हवे .उटणे आणि तेल यांचे मिश्रण.डाळीचे पीठ , हळद,दूध , चंदन पावडर यांचे मिश्रण .हे नैसर्गिक स्क्रबर आहेत .त्यामुळे .......
1.उटण्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुगंधित होते आणि तेला मुळे मुलायम .
2.कांती उजळते आणि शरीरावरील डाग कमी होतात .
3.चेहरा प्रसन्न आणि उजळ दिसतो.
4.शरीराला मंद सुगंध येतो .
हे अगदी सहज करण्यासारखे उपाय आहेत .
वैयक्तिक स्वच्छता ठेवा, निरोगी रहा, जीवनाचा आनंद घ्या.
©️ #प्राजक्ता_पाटील
👍
❤️
👌
35