लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
February 27, 2025 at 06:35 AM
*#लैंगिक_आरोग्य भाग-6*
https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t
#आफ्टर_प्ले
फोरप्लेची जेवढी गरज आहे तेवढीच गरज आहे आफ्टरप्लेची.माझ्या मनात होते आपल्याला आफ्टर प्लेवर पण पोस्ट लिहायला हवी.
सेक्स एजुकेशन ही महत्वाची आणि आपल्या जीवनातील अविभाज्य गोष्ट असूनही त्यावर बोलणे ,माहिती मिळवणे लोक वर्ज्य समजतात. सध्या काही संस्था,संघटना #चला_लैंगिकतेवर_बोलू_काही अशा विषयावर #वेबिनार घेत आहेत.
फोरप्ले हा भाग जेवढा महत्वाचा असतो तसाच #आफ्टर_प्ले पण महत्वाचा.
फोरप्ले जेवढा छान तेवढा सेक्स आनंददाई होईल. तसेच आफ्टरप्ले जेवढे छान तेवढं नातं सुदृढ़ होईल.
बऱ्याच लोकांना सवय असते इंटरकॉर्स झाला की लगेच बाजूला व्हायचे ,काही काही लोक इंटरकोर्स साठी जोडीदार तयार व्हावा म्हणून फोरप्ले करतील पण आफ्टर प्ले टाळतील.खूप थोडे लोकं आफ्टर प्ले करतील.
काय असतो आफ्टर प्ले इंटरकोर्स नंतर जोडीदाराला एकटे न सोडणे . त्याला थोड्या वेळासाठी बिलगून रहाणे ,गप्पा मारणे .शरीर जे एका लयित आलेले असते ती कंपनं असतात ती शांत व्हावी म्हणून जोडीदार आपल्या जोडीदाराला बिलागतो.हे शक्यतो स्त्री जास्त करते.तिला यातून एक प्रकारे आश्वासन , सुरक्षितता, स्थिरता ,हक्क असं सगळं यातून मिळते . इंटरकोर्स दरम्यान भावोत्कट झालेल्या तिला /त्याला जोडीदाराच्या कुशीत शिरून बसायचे असते .पण दुसरा जर ताडकन वेगळा झाला तर ज्याला तो स्पर्श हवा आहे त्याचं मन दुखावलं जातं आपल्याकडे सेक्स वर बोललं जात नाही त्यामुळे आपण सेक्स दरम्यान दुखवलो गेलो हे पार्टनर दुसऱ्या पार्टनरला सांगत नाही .ते दुसऱ्या रुपात प्रकट होते .
जसे की...
1. सेक्सचा तिरस्कार वाटणे.
2.जोडीदाराचा राग येणे .तो राग इतर मार्गाने व्यक्त करणे.
3.आपला जोडीदार आपल्याला फक्त वापरत आहे ही भावना बळावते .
4.नात्यात नकारात्मकता निर्माण होते.
5.पुढच्यावेळी जोडीदार सेक्स साठी जवळ आला तर नकार देवून त्या अपमानाचा बदला घेतला जातो .
इंटरकोर्स नंतर आपल्या जोडीदारा सामवेत थोडा वेळ एकत्र घालवणे म्हणजे #आफ्टरप्ले. यामुळे आपल्या जोडीदारा सोबतची भावनिक गुंतवणूक किंवा जवळीक अधिक दृढ़ होते.
जसे आपण पूर्ण जेवण म्हणजे स्टार्टर (जेवणा आधी तोंड खवळण्यासाठीचे पदार्थ) , मेन कोर्स (मुख्य जेवण) आणि शेवटी डेझर्ट ( जेवण झाल्यावर तोंड गोड करणे) याला म्हणतो तसे ..
सेक्सचे तीन टप्पे आहेत.तिन्ही महत्वाचे आहेत.
1.फोरप्ले
2. इंटरकोर्स
3.आफ्टरप्ले
#आफ्टर_प्ले_करताना.....
1.जोडीदारा पासुन लगेच बाजूला जाऊ नका. थोड्यावेळ बिलगुन गप्पा मारत बसा.
2. डोक्यावरुन ,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवत रहा.
3.जोडीदाराला जवळ घेवून पाठीवर हलकेच थोपटा.
4.एकत्र चहा/कॉफी घेत गप्पा मारा.
5.एकत्र अंघोळ करणे हा पर्याय पण छान आहे.
6.जोक सांगणे,मस्ती,चेष्टा मस्करी ,एकमेकांच्या आवडी,छंद यावर बोलणे.
7.पाठीला ,डोक्याला ,पायाला मसाज देत गप्पा मारणे (हे फोरप्ले साठी पण करता येते.)
8. थंडीच्या दिवसात घरात टोपल्यात ,शेगडी (कोळसा,भूसा) शेकोटी वर शेकत गप्पा , मस्करी
या व्यतिरिक्त तुमचा जोडीदार आणि तुम्ही तुमची कल्पकता वापरु शकता.
या सगळ्यांमुळे आपला जोडीदार आपल्याला खुप महत्व देतो ,जवळचे मानतो ही भावना मनात निर्माण होते. त्यामुळे जोडीदार अधिक खुलतो. कित्येकदा जोडीदार इंटरकोर्स नंतर जास्त खुलतो आणि त्यावेळी तो संवाद करण्याच्या मुड मध्ये असतो. त्यामुळे पती/पत्नी , प्रियकर/प्रेयसी यांच्यात आफ्टर प्ले नंतर मोकळा संवाद होतो.तो टाळणे म्हणजे एकमेकांच्यात भावनिक गुंतवणूक टाळणे .नात्यात दुरावा निर्माण करणे.
#हे_करू_नका
1.इंटरकोर्स नंतर लगेच जोडीदारा पासुन दूर जाणे.
2. लगेच आपली जागा पकडून झोपी जाणे.
3. इंटरकोर्स नंतर जोडीदाराशी तुटक वागणे.
4.जोडीदाराकडे लगेच पाठ फिरवुन झोपी जाणे.
5. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सकाळी लवकर उठायचे आहे. म्हणून संवाद टाळणे.
तुम्ही हे कराल तर जोडीदारासोबत भावनिक जवळीक निर्माण करण्याची संधी गमावून बसाल.
असे वारंवार घडल्यास जोड़ीदाराच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.मनात दुरावा निर्माण होईल,अति झाल्यास चिडचिड होईल.
म्हणून आफ्टरप्ले कधीही टाळू नका.
©️ #प्राजक्ता_पाटील

👍
👌
❤️
🙏
😂
23