Diva City, Thane District
Diva City, Thane District
February 23, 2025 at 09:58 PM
देशातील जनतेचे पैसे घ्यायला तयार पण जबाबदारी घ्यायला नको असे कसे होईल! अगदी माफक व्याजाने घेतलेले जनतेचे पैसे, जनतेलाच जास्तीच्या व्याजनेही द्यायला आम्ही तयार पण जबाबदारी नको, असे कसे होईल! एक जागरूक ग्राहक, देशाचा आदर्श नागरिक होऊ शकतो. आणि ज्या देशाचा ग्राहक जागरूक आहे, म्हणजेच आदर्श नागरिक आहे. तो देश नक्कीच प्रगतशील असेल, प्रगतीकडे वाटचाल करेल! @Social2Worx आपण ज्या ठिकाणी, एखादी वस्तू, सेवा विकत घेतो त्याठिकाणी ग्राहक आणि विक्रेता असे नाते तयार होते. पैसे घेऊन निकृष्ट दर्जाची वस्तू देणं, सेवा देणं, हे अनुचित व्यापारी प्रथेमध्ये येते, आणि याला ग्राहक संरक्षण कायदा २०१९ ने प्रतिबंधित केलेलं आहे. मित्रांनो, छापील किंमत म्हणजे एमआरपी पेक्षा जास्त दराने कोणतीही वस्तू विकता येत नाही. असे घडल्यास तत्काळ बिल घेऊन, अन्न व औषध प्रशासनाला तक्रार करा, त्याची दखल घ्यावी लागेल. कोणतीही सेवा विकत घेतली अथवा वस्तू विकत घेऊनही त्याचा दर्जा, दिलेल्या सोयी सुविधांबाबत ग्राहकाला शंका असतील तर ते ग्राहक न्यायालयात तक्रार करून दाद मागू शकतात. अनेकदा ग्राहकांवर अन्याय होत असुन दाद मागितली जात नाही. @Social2Worx
Image from Diva City, Thane District: देशातील जनतेचे पैसे घ्यायला तयार पण जबाबदारी घ्यायला नको असे कसे होईल!...

Comments