Diva City, Thane District
Diva City, Thane District
February 26, 2025 at 07:17 PM
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील खिडकाळेश्वर येथील प्राचीन शिव मंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शंकराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिरातील स्वयंभू पिंडीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख समृद्धी आणि समाधानाचे आयुष्य लाभो अशी मनोकामना ही केली. तसेच यावेळी कल्याण येथील मानपाडेश्र्वर, डोंबिवली येथील पिंपळेश्वर येथेही भगवान शंकराचे दर्शन घेतले. यावेळी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. भाविकांनी दिलेल्या हर हर महादेवच्या जयघोषाने सर्व वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. यावेळी सर्व भाविकांशी संवाद साधून त्यांना महा शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यासह कल्याण - डोंबिवली येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #drshrikanteknathshinde #shivsena #mahashivratri
Image from Diva City, Thane District: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।  उर्वारुकमिव बन्धनान् मृत्...

Comments