✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
January 30, 2025 at 05:36 PM
*शिक्षक आ.जयंत आसगांवकर यांच्या हस्ते जीवनगौरव व, आदर्श गणित शिक्षक पुरस्काराचे वितरण...* _सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन..._ पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आ.जयंत आसगावकर आणि, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते जीवनगौरव व आदर्श गणित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज गुरुवार रोजी अक्कलकोट येथे पार पडला. सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आज सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून आ.जयंत आसगांवकर म्हणाले की, गणिताचे ज्ञान आणि वापर हा व्यक्ती व समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ते सोप्या पद्धतीने शिकविण्याचे काम आमचे शिक्षक बांधव करतात. आज शासन आमच्या शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामे लादून त्यांना वेठीस धरत आहे. याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. 'शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकूद्या' ह्या मताशी मी ठाम आहे. निवडून आल्यानंतर मी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वरित इतर प्रश्नही मार्गी लावण्यास मी कटिबद्ध आहे. यावेळी इतर काही मान्यवरांनी देखील आपली मनोगते इथे व्यक्त केली. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील, राज्य गणित मंडळाचे प्रकाशन समिती प्रमुख शिवशरण बिराजदार, वळसंग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे, अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार संजय भंडारे, सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय भस्मे, श्रावण बिराजदार, महेश सरोदे, वैजिनाथ हत्तुरे, आण्णासाहेब गायकवाड, लक्ष्मण चलगेरी, सचिन झाडबुके, विद्यानंद स्वामी, रामचंद्र जानकर यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच, पालक याठिकाणी उपस्थित राहिले होते.

Comments