
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 1, 2025 at 05:48 PM
*राष्ट्रहितापेक्षा राजकिय स्वार्थासाठीचा अर्थसंकल्प...*
देशातील मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी तसेच, दिल्ली आणि बिहारमधील मतदार डोळ्यांपुढे ठेवून भाजप सरकारची ही नवीन जुमलेगिरी आहे. महागाई व, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांना बगल देवून फक्त करसवलतींवरच मध्यमवर्गाची बोळवण केली गेली आहे. केवळ भावनिक आणि, धार्मिक धोरण ह्या अर्थसंकल्पाद्वारे रेटले गेले असून कुठल्याही निवडणुका जवळ आल्या की करकपातीचे गाजर दाखवायचे व सत्ता टिकली की; लुटायचे हाच भाजपचा खरा चेहरा आहे.
ह्या अर्थसंकल्पाद्वारे भाजप सरकारने दलित, ओबीसी व, अल्पसंख्याकांच्या कल्याणकारी योजना संपवून सामाजिक कल्याण क्षेत्रात विषमतेचा आणि जातीवादाचा कळस गाठला आहे. आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास अशा अनेक क्षेत्रांत केलेली निधींची कपात हा देशाच्या भविष्याशी खेळ आहे.
*~ आ.सतेज उर्फ, बंटी पाटील*
[काँग्रेस गटनेते, महाराष्ट्र विधानपरिषद]
👍
1