✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 2, 2025 at 05:57 PM
राजकीय पक्षांच्या फोडाफोड्या करताना आणि विरोधी पक्षांतील नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविताना मोठी तत्परता दाखविणारे घोटाळेबाज महायुतीचे गतिमान सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याविषयी एवढे निष्क्रिय का? पुणे शहरामध्ये 'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) रोगाचा उद्रेक जानेवारी महिन्यातील ९ तारखेपासून सुरू झालेला आहे. परंतु; सत्ता स्थापणे, मंत्र्यांचे खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमणे यांतच व्यस्त असणारे खोटारडे राज्य सरकार तब्बल तीन आठवड्यांनंतर जागे झाले आहे हे खूपच चिंताजनक आहे. ह्या रोगाचा प्रादुर्भाव हळूहळू शेजारील जिल्ह्यांसोबतच राज्यामध्ये होवू लागलेला आहे.

Comments