✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 13, 2025 at 06:13 PM
*जिल्हा परिषद अध्यक्ष ते, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. माननीय हर्षवर्धन सपकाळ यांचे मनापासून अभिनंदन...* उत्तम संघटन कौशल्य आणि, काँग्रेस पक्षावरील अढळ निष्ठा ह्या सर्वांच्या जोरावर माजी आमदार "हर्षवर्धन सपकाळ" यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन... बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा आपला प्रवास कौतुकास्पद आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी, त्यांच्या कष्टाला आणि, निष्ठेचा योग्य सन्मान हा काँग्रेस पक्षच करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आपण केलेल्या विविध विकासकामांमुळे जनसामान्यांचे जीवन अधिक सुरळीत झाले. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून "राजीव गांधी पंचायत राज" संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा विचार देशातील अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण रात्रंदिवस झटलेले आहात. ‘आदिवासी जिवनोत्थान’ यासारख्या उपक्रमाद्वारे शेवटच्या घटकासाठी लढण्याची भूमिका, कार्यकर्त्यांशी जोडले जाण्याची आणि, जनतेशी संवाद साधण्याची आपली तळमळ पक्षासाठी खूप महत्वपूर्ण ठरली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देण्यासाठी आपण सगळे मिळून कार्यरत राहूया. आपल्या पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.
👍 1

Comments