✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
✋️Solapur District Congress Committee – Social Media Department (Official) ✋️
February 14, 2025 at 08:45 AM
*_सूर गवसत नसला की, खरा खेळाडू 'बेसिक्स' पक्के करायला घेतो. बेसिक्सपासून भटकलात की, तुमचा कपाळमोक्ष अगदी निश्चित असतो._* कॉंग्रेस बेसिक्सपासून भरकटलेली होती. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांशी तिची नाळ कमजोर पडली आणि मूठभर सरंजामदारांचे उखळ चांगलेच पांढरे झाले. परिणामी कॉंग्रेस पक्षाचा खरा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचलाच नाही. याचा परिणाम म्हणजे, विविध निवडणुकांतील नामुष्कीजनक पराभव... त्यानंतर ज्या घोड्यावर आपली मांड पक्की करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तो घोडा खालच्या खालून निसटून कधी समोरच्या विरोधी गोटात गेला हे आमच्या पक्षश्रेष्ठींनाही समजले नाही. कॉंग्रेस सूर हरवलेल्या खेळाडूसारखी खेळपट्टीवर चाचपडत खेळत होती. मैदानात वारंवार थोबाड फोडून घेतल्यानंतर कॉंग्रेस महाराष्ट्रात बेसिक्स पक्के करायला उतरली आहे. ही खरोखरच स्वागतार्ह अशी बाब आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्षपदी नेमणे ही त्याची सुरुवात म्हणता येईल. कॉंग्रेस अजूनही देशाच्या नसानसांत भिनलेली आहे. मतदारदेखील जागेवर आहे आणि, कार्यकर्ते देखील... *_कॉंग्रेसने सरंजामी बेलबुट्ट्या फेकून देवून नव्याने कात टाकली पाहिजे. कारण, कॉंग्रेसचे सामान्य असणे देशासाठी खूप महत्वाचे आहे._*

Comments