पोलीस भरती मार्गदर्शन 2025
पोलीस भरती मार्गदर्शन 2025
February 8, 2025 at 12:33 PM
*✅👉 पंतप्रधान विश्वकर्मा योजना ☑️* 👉 सुरुवातः 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्ली येथे. 👉 18 ओळखल्या गेलेल्या पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या भारतीय कारागिरांना लाभ देण्यासाठी संकल्पित केलेली पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Scheme) आहे. 👉 या योजनेंतर्गत 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारद्वारे रु. 13,000 कोटी खर्च केले जाणार आहेत. 👉 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नोडल / मध्यवर्ती मंत्रालय आहे. 👉 गुरु-शिष्य परंपरा किंवा कारागीरांद्वारे हातांनी आणि साधनांनी काम करण्याच्या पारंपरिक कौशल्यांना बळकट करणे आणि त्यांचे पालनपोषण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 👉 या योजनेचा उद्देश हा कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता आणि आवाका सुधारणे तसेच विश्वकर्माना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत एकात्मिक करणे हा आहे. 👉 कारागिरांना लाभः * ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत करेल. * योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांची (विश्वकर्मा) बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. * मान्यताः कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे मान्यता प्रदान केली जाईल. * स्किल अपग्रेडेशनः दररोज रु. 500 स्टायपेंडसह 5-7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांचे प्रगत प्रशिक्षण प्रदान केले जाईल. • * टूलकिट प्रोत्साहनः मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ई-व्हाऊचरच्या स्वरूपात 15,000 रु. पर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल. * क्रेडिट सपोर्ट: रु. 3 लाख पर्यंतचे तारणमुक्त एंटरप्राइज डेव्हलपमेंट कर्ज दिले जाईल. हे कर्ज रु.1 लाख आणि रु. 2 लाख अशा दोन टप्यांत, अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 5% निश्चित केलेल्या सवलतीच्या दराने (भारत सरकारच्या १% च्या मवदिपर्यंत सवलतीमध्ये) दिले जाईल. * ज्या लाभार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते रु. 1 लाख पर्यंतच्या कर्ज सहाय्याच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेण्यास पात्र असतील. दुसरा कर्जाचा टप्पा अशा लाभार्थ्यांना उपलब्ध असेल ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे आणि एक मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत किंवा प्रगत प्रशिक्षण घेतले आहे. * डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहनः कमाल 100 मासिक व्यवहारांपर्यंत रु. प्रति डिजिटल व्यवहार असे प्रोत्साहन प्रत्येक डिजिटल पे-आउट किंवा पावतीसाठी लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाईल. • विपणन समर्थनः कारागीरांना गुणवत्ता प्रमाणपत्र, * ब्रेडिंग, त्राच् सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग, जाहिरात, प्रसिद्धी आणि मूल्य शृंखलाशी संबंध सुधारण्यासाठी इतर विपणन क्रियाकलापांच्या स्वरूपात विपणन समर्थन प्रदान केले जाईल. * ही योजना औपचारिक एमएसएमई इकोसिस्टममध्ये 'उद्योजक' म्हणून उदयम असिस्ट प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना ऑनबोर्ड करेल. 👉या योजनेंतर्गत येणारे 18 पारंपरिक व्यवसायः👍 (1) सुतार (i) जहाज बनवणारे (Boat maker) (iii) आयुधिक (Armourer) iv) लोहार (v) हॅमर आणि टूल किट मेकर; (vi) कुलूप बनवणारे (Locksmith) (vii) सोनार; (viii) कुंभार (ix) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारा), दगड तोडणारा; (x) चर्मकार / चपला किंवा पादत्राणे कारागीर (xi) गवंडी / राजमिस्त्री (xii) बास्केट/चटई/झाडू बनवणारे / कोयर विणकर; (xiii) बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक); (xiv) न्हावी (xv) हार बनवणारे (माळाकार); (xvi) धोबी (xvii) शिंपी (xviii) माशांसाठी जाळे बनवणारे.
👌 1

Comments