
SwaRa "पुस्तक परिचय"
January 30, 2025 at 05:27 PM
पुस्तकं वाचायला आवडतात. पण वेळच मिळतं नाही. असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. पण त्यासाठी ते पुस्तकांच्या जवळ जातात का?
तर नाही.
म्हणून मग १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ हे १५ दिवस सतत पुस्तक बाळगूया.
मला विश्वास आहे, ज्यांना पुन्हा पुस्तकांशी नातं जोडायचं आहे त्यांना या १५ दिवसात नक्की मदत होईल.
बरं तुम्हाला पुस्तकं वाचण्याची जबरदस्ती आहे का?
तर अजिबात नाही.
तुम्हाला जसं जमेल तसं मोबाईल ऐवजी पुस्तक हातात ठेवायचं आहे.
ज्यांना ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल त्यांनी आपला सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करा. सोबत दोन #टॅग जोडा. #bondingwithbooks #vaachanveda
तुम्हाला आपल्या उपक्रमात कुणी सहभागी होताना दिसलं तर त्यांचा फोटो काढून hashtag सकट सोशल मीडियावर पोस्ट करा.
हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
पुस्तकासोबत जगणारी, पुस्तकावर प्रेम करणारी माणसं जोडूया, वाढवूया.
संकल्पना : सुमेध आणि विनम्र भाबल
BondingWithBooks Logo: शेखर शिंपी
Artwork: ऐश्वर्या तेंडुलकर
वाचनवेडा लोगो : अक्षर शेडगे
#bondingwithbooks #vaachanveda #वाचनवेडा #vachanveda #book #books #read #readers