
SwaRa "पुस्तक परिचय"
204 subscribers
About SwaRa "पुस्तक परिचय"
*नमस्कार वाचन प्रेमी मित्र मैत्रिणींनो* *कृपया हे चॅनल फॉलो करा..* *आता या चॅनेलवर पुस्तकांच्या माहितीच्या मोफत अपडेट्स मिळतील रोज एका वाचनीय पुस्तकाचा परिचय या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील.* . *स्वरा बुक्स ऑनलाइन स्टोअर* 9579824817
Similar Channels
Swipe to see more
Posts

*पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतली एकमेव कादंबरी.* *पावसाची विविध रूपं इथे सहज विकसित होत जातात. शेतकरी आणि पाऊस, खेडं आणि पाऊस यांचे अनोखे नातेबंध या कादंबरीत उलगडतात. या कादंबरीत पाऊस एका वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. झडीचा पाऊस येण्याआधी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा गाव आणि झडीचा पाऊस सुरू झाल्यानंतर बेहाल झालेलं गाव या कादंबरीत चित्रित झालेलं आहे. या झडीत गाव, माणूस, शेती, वृक्षवल्ली, जलचर, पाळीव प्राणी हे सारेच हतबल, अगतिक होऊन जातात आणि त्यांची दाणादाण उडून जाते. पाण्याचे, पावसाचे आणि माणसाचे नवे ताणतणावात्मक, उद्ध्वस्ततेकडे झुकलेले नातेबंध ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते.* *पावसाने हाहाकार मांडल्यानंतर जीव गमावणारे, जीव वाचवण्यासाठी धडपडणारे, जगण्याची तीव्र आकांक्षा असणारे या सर्व परिस्थितीत कसे बदलतात, वर्तन करतात याचे सूचन कादंबरीच्या तपशिलातून कृष्णात खोत समर्थपणे करतात.* *महापुरातील चौमाळ पाण्यासारखी कृष्णात खोत यांची भाषा या कादंबरीत वाचणाऱ्याला खिळवून ठेवतेच पण त्याहीपेक्षा अधिक घन मानसिकतेतून द्रव मानसिकतेत आणून वादळी व्हायला भाग पाडते* *झड-झिंबड ही कृष्णात खोत लिखित कादंबरी खरेदी करण्यासाठी कृपया पुढील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.* Swara Books 9579824817


🚩 *शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!* 🚩 स्वराज्याच्या त्या ऐतिहासिक घटनेचा आज आपल्याला अभिमान वाटतो… चला, पुन्हा एकदा शिवसंकल्प घेऊया ... न्याय, धर्म आणि स्वाभिमानासाठी झुंज देणारा मार्ग निवडूया!... जय जिजाऊ! जय शिवराय! Swara Books 9579824817


*• खोल खोल पाणी : या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. ‘कुलामाठारी` या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी."* *• सरण : जातीवादाच्या विखारात होरपळलेल्या युवतीची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी.* *खरेदी करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.* *स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर* 9579824817


*📖 आधुनिक स्फूर्तिकथा* *✍🏻 श्रुती पानसे* "आजच्या पिढीपुढे आदर्शच नाहीत!" पण खरंच असं आहे का? थोडं थांबा... आजूबाजूला बघा... प्रेरणा देणारी माणसं अजूनही आहेत! अशा काही खास व्यक्ती… ज्यांनी संघर्षातून यश मिळवलं. फक्त स्वतःचं आयुष्य घडवलं नाही, तर इतरांचंही उजळवलं. त्यांची कहाणी तुमच्यापर्यंत यावी म्हणून हे खास पुस्तक – आधुनिक स्फूर्तिकथा हे पुस्तक तुम्हाला स्वतःकडे नव्यानं पाहायला लावेल. मोठी स्वप्नं पाहायला शिकवेल. आणि ठाम उभं राहायला बळ देईल. ** मूळ किंमत : रु. 125/-* ** सवलत किंमत : रु. 100/-* स्वरा बुक्स ऑनलाईन ** संपर्क : 9579824817*

🔥 *अन्यायाच्या विरुद्ध लढत जगभरात क्रांतीची मशाल पेटवणारे तीन महान क्रांतिकारी.* १) *स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल प्रत्येक तरुणाच्या काळजात बिंबवणारा क्रांतिकारी म्हणजे भगतसिंह.* पुस्तक : शहीद-ए-आझम भगतसिंह लेखक : प्रतिक पाटोळे प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे किंमत : ३५० रू ------------------------------ २) *६३८ वेळा खुनाचा प्रयत्न होऊन देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानता ६० वर्षे क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे, फिडेल कॅस्ट्रो !* पुस्तक : फिडेल कॅस्ट्रो लेखक : प्रणित पवार प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे किंमत : ३०० रु ---------------------------- ३) *२० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून टाइम मॅगझिनने गौरवलेला* *चे ग्वेरा आजही क्रांतीचे सर्वोच्च प्रतीक मानला जातो.* पुस्तक : चे ग्वेरा लेखक : प्रणित पवार किंमत : ३०० रु प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे ------------------------------ *खरेदी करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.* *स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर* 9579824817


*कथा अज्ञात स्वातंत्र्य सौनिकांच्या* प्रा. डॉ. शिवाजी मस्के मिहाना पब्लिकेशन्स 192 पाने किंमत 300/- . भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांसोबतच सामान्य नागरिकांनी आपले बलिदान दिले आहे. अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व समर्पणातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. हा बलिदानाचा, त्यागाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांना सांगितला जावा. थोर व्यक्ती असतील तर गावागावांत त्यांचे पुतळे उभारले जातात, पण थोरांप्रमाणेच सामान्य माणसेही बलिदान देत असतात त्यांचे बलिदान व समर्पण लोकांना कळले पाहिजे. अशा या अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे पुतळे उभारले जात नाहीत, त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी होत नाही, पण त्यांचे योगदान थोरांपेक्षाही श्रेष्ठ असते. गंगा विशाल बनते ती तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांमुळे. ज्यांनी बलिदान दिले त्यांना आठवणे, त्यांच्या त्यागाचं स्मरण करणं ही एक राष्ट्रसेवाच आहे. . तुमची आवडती पुस्तके घरपोच मिळवनेसाठी तुम्ही व्हाट्सअँप द्वारे देखील संपर्क करु शकता. +91 9579824817 🙂 *स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर.* पुस्तके रजिस्टर पोस्ट ने घरपोच मिळतील...
