SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 3, 2025 at 02:39 PM
!! जय हरी ! जय महाराष्ट्र ! नमस्कार !! ll गोष्टीरूप हरिपाठ ll श्री. अनिल फडणवीस यांनी लिहिलेलं पुस्तकं अतिशय मनवेधून तर घेतच त्याचसोबत अर्थसाहित विशेष म्हणजे गोष्टीरूप अर्थसाहित आहे. हरिपाठ हा २७ अभंगांचा , ( वारकरी संप्रदाय परंपरेनुसार) मानल्या जातो. विशेष म्हणजे ह्या पुस्तकातील हरिपाठ समजावा ह्यासाठी ज्या गोष्टी, कथा मांडलेल्या आहेत त्यातून सुद्धा मनाला बोध होतोच होतो. हरिपाठाचे एकूण अभंग २७ , मात्र याच २७ अभंगावर २०२ पानी पुस्तकांत असे काय लिहिले असेल असा प्रश्न मला सुरुवातीला होता. कारण हरिपाठ हा ग्रंथ लहान जरी असला तरी तो समजण्याजोगा नाही हेच आपण मुळात मान्य करत नाही. कारण माउलींनी तो लहान लिहिला म्हणजे सोपा आहे असाच अर्थ आजपर्यंत सर्वांना ज्ञात आहे. असाच सर्वांचा ग्रह आहे. पण कीर्तनातून ही फारसा उल्लेखासहित स्पष्टीकरण करून मी आजपर्यंत क्वचित प्रसंग सोडले तर कीर्तनकार महाराजांच्या तोंडून विस्तृत विवेचन म्हणा हवे तर मला तरी प्रत्यक्षात ऐकायला मिळाले नव्हते. म्हणजेच हरिपाठ सर्वांच्या तोंडपाठ असेल , आहे आणि राहील ही म्हणून काही हरिपाठ समजला असा त्याचा अर्थ अजिबात घेऊ नये असे तरी मला समजते. कारण संताच्या रचलेल्या शब्दांचा अर्थ लावता येईलही मात्र ते शब्द समजून लावता येईल जेव्हा त्या शब्दांना माऊलींचा सहवास आहे आणि मग ते शब्द अवतरले हे समजून घेत आपण हरिपाठाकडे पाहिले, वाचले , त्याचे चिंतन केले तर तेवढेच अधिक खोलात एकेक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ हा आपल्याला घेऊन जातो. हेच मला तरी या पुस्तकातून अधिक स्पष्ट झाले आहे. पुस्तक सर्वांनी वाचायला हवे. कारण हरिचा पाठ म्हणजे काय ? येथपासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्हीच समजून घ्या की किती सोप्या शब्दांत रचना करून एकेक अभंग किती विस्तृत कथा रूपाने लिहिलेला आहे. #धन्यवाद_लेखक #श्री_अनिल_फडणवीस_सर #वाचक #श्री_सुदर्शन_प्र_किन्होळकर #spkinholkar #किन्होळा_जिल्हा_बुलढाणा . पुस्तक मूळ किंमत - ३५०/- *सवलतीत ३२०/- मध्ये घरपोच मिळेल.* *शिपींग फ्री* स्वरा बुक्स ऑनलाईन स्टोेअर 9579824817 .

Comments