SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 3, 2025 at 03:07 PM
#वाचनवेडा 'प्रतिपश्चंद्र' म्हणू का 'द सिक्रेट ऑफ शिलेदार'???? तुम्ही पुस्तके वाचलत का???? मराठी माणसाने मराठी माणसाच्या पुस्तकावर बनवलेली पहिली हिंदी वेबसिरीज जी अनेक भाषांमध्ये डब झालीये,अभिमान वाटतो अशावेळी. धन्यवाद डॉ. प्रकाश कोयाडे सर. जस पुस्तक वाचतो तसेच याचे भाग आहेत. फक्त पुस्तकात अनेक संदर्भ आहेत, मध्ये अनेकांच्या गोष्टी आहेत. यामध्ये तुम्हाला शिलेदार, त्यांच्या आयुष्याच उदिष्ट असलेल खजान्याच रक्षण आणि त्या खजान्याचा शोध या भोवती फिरणारी कथा आहे. कथेची मांडणी अतिशय सुरेख आहे. तुम्हाला कुठेच कंटाळा येत नाही. कथेचा वेग जास्त आहे. मला हि वेबसिरीज पाहताना अनेक ठिकाणी जस पुस्तक वाचताना कल्पना केलेली अगदी तसच समोर पाहतोय अस वाटतं होत. या वेब सिरीजमुळे अनेक नवे लोक पुस्तके वाचतील, नवे साहित्यिक चांगल साहित्य निर्माण करतील आणि अनेक दिग्दर्शक अशा सुंदर पुस्तकांवर दर्जेदार वेबसिरीज काढतील हि आशा. बाकी नक्की हि वेबसिरीज बघा. नवीन सिरीज बघत रहा आणि पुस्तके वाचत रहा. तुम्हाला कोणत्या कोणत्या पुस्तकांवर चित्रपट किंवा वेबसिरीज तरी बनावी अस वाटतं???? मला नक्की सांगा.. Vrushali Navaghane Mangade

Comments