SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 5, 2025 at 03:50 AM
कवी ग्रेस यांची "संध्याकाळच्या कविता" हा कवितासंग्रह वाचनात आला. कातरवेळ ...संध्याकाळ .. एकांत , काठ, दिवा, वात, तळे हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय!! दूरदूर पसरत गेलेली स्तब्धता, निळेशार ढग, नि:शब्द एकटेपण, सांजवात, तेवणारी समई, गार वारा, गहिरेपण अशा कितीतरी उपमांनी केलेले संध्याकाळचे म्हणजेच कातरवेळचे वर्णन. .... वाचताना बेभान होतो.. शब्दांवर शब्द आदळत राहतात आणि आपण शून्य होऊन अर्थ चाचपडतो, शोधतो... कधीतरी तो सापडतोही पण त्यावेळी कवितेचा अर्थ बदललेला असतो आणि शब्दांचे मोल हे अनमोल असतात हे समजत जाते... विरत जाते... चिरतरुण राहते... ✍️ @sanjusdiary

Comments