SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 11, 2025 at 01:01 PM
बरं चाल्लं व्हतं. कुनाचं एक न्हवतं का दोन न्हवतं... ...अशा जेमतेम दीड वाक्यानं 'पाचोळा'ची सुरुवात होते. हे वाक्य अख्ख्या कादंबरीविषयी मागचं-पुढचं सूचन करतं. या वाक्यापासून आपण कादंबरीत गुंतत जातो. पहिल्यांदा मी ती वाचली तेव्हा माझी तरी तशी अवस्था होती. मोठ्या कृतीतली पात्रंही टिकून राहतात. पुन्हा पुन्हा समोर येतात. अस्वस्थ करत राहतात. गंगाराम, पारबती आणि भाना ही पात्रं विसरता येत नाहीत. विशीतच सुरुवातीला असं वाचायला मिळालं त्याबद्दल कृतज्ञ वाटतं. रा. रं. बोराडे यांनी मराठी कथात्मक साहित्यात टिकून राहील अशी कृती दिली होती. अतिशय प्रेमळ आणि स्नेहशील होते ते. उमद्या मनाचा मोठा माणूस. सरांना विनम्र आदरांजली. । गणेश विसपुते

Comments