SwaRa "पुस्तक परिचय"
February 12, 2025 at 03:17 AM
आजचा माझा लिहिण्याचा विषय म्हणजे आयुष्यभर एकच रंगाचे कपडे वापरायचे व त्याचे असणारे भरपूर फायदे त्याविषयी बोलणार आहे. आपण सर्वांनी सांगलीमध्ये अशी कोण कोणती व्यक्तिमत्त्व पहिली आहेत की ज्यांना तुम्ही आयुष्यभर एकाच रंगाचे कपडे वापरले असे पहिले आहे किंवा अजुनही वापरतात.
एकाच रंगाचे कपडे वापरण्याचे पुढील काही विलक्षण फायदे .......
१) सोपेपणा आणि शक्ती वाचवणारे असते : तुम्ही विचार करा नेहमी तेच कपडे घालणार हे किती सोप व सहज आहे. रोज रोज नवीन कपडे घालणार ते कसे घातले पाहिजे त्याचा विचार करणार त्याची फॅशन मेंटेन करणार त्याची काळजी करणं आलं किंवा समाजातला ट्रेंड लक्षात घेणं हे खूप शक्ती वाया घालवण्याचे हे प्रकार आहे तर त्या सगळ्या प्रकारातून आपण आपल्याला वाचू शकतो.
२) समाजामध्ये नेहमी सारखेपणा दिसणे. तुमची वेगळी प्रतिभा तयार होणे : नेहमीच सारखे कपडे घातल्यामुळे तुम्हाला वेगळ्या कपड्यांचा विचार नाही करावा लागत किंवा आपण कसे दिसणार आहोत याचाही विचार करावा लागत नाही तर हे खूप तुमचा वेळ आयुष्यातली वाचवणारी गोष्ट आहे आणि दुसरा त्याचा असा फायदा आहे की तुमची अतिशय छान पर्सनॅलिटी तयार होते की मग त्याच्याकडे तुम्हाला पुन्हा नव्याने बघावं लागत नाही हे कपडे घातल्यावर मी कसा दिसेल दुसरे कपडे घातल्यावर मी कसा दिसेल याचा त्रास कधीही होत नाही.
३) आयुष्यामध्ये एक नियमितपणा आणू शकता : नियमितपणाचे तसेही खूप फायदे आहेत पण त्यातला हा ही एक खूप मोठा फायदा आहे की आपण कुठले कपडे घालणार याच्यावर खूप विचार करायला वेळ खर्च करत नाही आणि या नियमितपणाचा किंवा यासारखेपणाचा खूपच आपल्याला आयुष्यात फायदा होतो रोज काय घालायचं याचा विचार करावा लागत नाही आणि त्याचा तुमचं करिअर घडवण्यामध्ये फायदा होतो. लोकांना नक्की माहिती असतं की तुम्ही आज कसे दिसणार आहात. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही वेगळा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल.
४) जे एक रंगाचे कपडे घालतात ते तुमच्यासाठी खूप आनंद आणि आत्मविश्वास तयार करतात : त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आयुष्यामध्ये दुसरं काहीतरी करण्यासाठी व इतर विचार करायला खूप वेळ मिळतो. म्हणजे या अशा नियमितपणामुळे आपल्या आयुष्यातील खूप वेळ वाचतो. हवं तर करुन बघा.
माझ्या माहितीत सांगलीतील मोठी व्यक्तिमत्व म्हणजे पूज्य संभाजी भिडे (गुरुजी) , माझे काही शाळेतील शिक्षक पण होते तसे पण बाकी आत्ता तरी फार आठवत नाही.
माझ्या माहितीत सांगलीतली छोटी व्यक्तिमत्व या सदरात बोलायचं तर भरपूर भाजीवाले, फळ विक्रेते हे मी पाहिले आहे की ते रोज त्याच रंगाचे कपडे घालायचे आणि सांगलीचे विशेषता पाहिल असेल तर पांढरा लेंगा आणि पांढरा शर्ट हे अगदी भरपूर सांगलीकर अजुनही आनंदने पाळतात असं जरी म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. मला अभिमान आहे.
परदेशातील सर्वांना माहीत असलेलं अशा सदरातील व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर mark Zuckerberg. भारतातील जुनी व्यक्तिमत्व सांगायला गेली तर त्याच्यामध्ये महात्मा गांधीजी होते. विनायक दामोदर सावरकर होते लोकमान्य टिळक होते. खरंतर जुन्या काळामध्ये अशी व्यक्तिमत्व खूप होती.
तुमच्या आठवणीमध्ये सांगलीतील अशा प्रकारची कोण कोणती व्यक्तीमत्व आहे प्लीज कमेंट्स करून कळवा.
नरेंद्र कुलकर्णी.
❤️
1