SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 16, 2025 at 08:25 AM
वाचावंअसंपुस्तक बहुचर्चित "इच्छामरण" पुस्तकाच्या प्रसिद्ध लेखिका संगीता लाटे यांच्या नजरेतून "ब्युटी ऑफ लाईफ" "आजार हा फक्त शरीराला होतो.. तो तुमच्या मनाला कधीच होऊ शकत नाही" असे सांगणारे पुस्तक म्हणजे "ब्युटी ऑफ लाईफ" आशा नेगी लिखित "ब्युटी ऑफ लाईफ", द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्ह्यायवर हे पुस्तक आज वाचून पूर्ण केले.... लेखिकेची "कॅन्सर" सारख्या आजाराशी लढण्याची जिद्द पाहून मला माझी आणि माझ्या पतीची आज आठवण आली. आजार कसा हाताळायचा, त्याचबरोबर स्वतःचे कुटुंब व स्वतःचा आनंद पहात आजाराशी लढा कसा द्यायचा त्यासाठी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, पुस्तक नव्हे ही तर संघर्ष गाथाच..... अत्यंत सुखी समाधानी जीवन जगत असताना जीवनाच्या एका टप्प्यावरती आलेला हा आजार, त्यासाठी करावा लागणारा जीवघेणा संघर्ष, चुकीचे झालेले ऑपरेशन, त्याच्यामुळे वर्षभर हाताची हालचाल नाही, चुकीची ट्रीटमेंट, ऑपरेशन नंतर डॉक्टरांचा न भेटणं, डॉक्टरांचे चुकीचे वागणे हे खूप क्लेशदायक. मलाही हा अनुभव आहे की डॉक्टरांचे वागणे आत्ता अशा प्रकारे होत आहे की, एखाद्या शोरूम मध्ये आपण गेल्यानंतर गाडी घ्यायची असल्यास ते खूप गोड गोड बोलतात आणि ज्यावेळी गाडी घेऊन झाल्यानंतर पुन्हा गाडी सर्व्हिसिंग ला नेतो त्यावेळी बसा, वाट पहा. त्यावेळी त्यांना आपल्याशी काही देणे घेणे नसते हेच माझ्या आणि लेखिकेच्या बाबतीत सुद्धा आलेला डॉक्टरांचा अनुभव अत्यंत मार्मिकपणे लेखिकेने लिहला आहे. लेखिकेने अत्यंत धाडसाने स्वतःच्य्या आजारावर केलेली मात, जीवघेणा संघर्ष, आयुष्यातील चढ उतार, ते आयुष्यातील आजारातील नकोसे दिवस ह्याची विस्तृत मांडणी , डायरी रुपी हे पुस्तक हे तर एक नवलच वाटते. मला लेखिकेचं कौतुक वाटतं, सर्वसाधारणपणे लोक कॅन्सर ऐकले तरी घाबरून डिप्रेशन मध्ये जातात पण ट्रीटमेंट चालू असताना स्वतःचा प्रवास तिने लिहून ठेवला... केवढं हे धाडस.. केवढी ही सकारात्मकता.. स्वतःच्या मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे लिखिकेने स्वतः शोधली.. ऑपरेशनच्या वेळेस नवरा इथे नाही.. आई वयस्कर आहे म्हणून आईला सांगितले नाही.. जवळच्या एक दोन मित्र मैत्रीविषयी चर्चा करून तिने एकटीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.. डॉक्टरच्या चुकीमुळे ऑपरेशनच्या वेळेस तिची C5 C6 शीरेला धक्का बसल्यामुळे तिच्या हाताची हालचाल एक वर्षभर होत नव्हती. स्वतःला होत असलेला त्रास तरीही ती कुठेच डिप्रेस्ड किंवा टेन्शन प्रेशर मध्ये दिसत नाही.. उलट आलेल्या प्रसंगाला तेवढ्याच संयमाने आणि आनंदाने सामोरे जायचे धैर्य दाखवलं... त्याचवेळी असे वाटते की, मी तिची मैत्रीण असते तर, ज्याप्रमाणे योगिता ही तिची मैत्रीण होती त्याप्रमाणे मीही तिची मैत्रीण होऊन घरामध्ये राहून तिच्या दोन्ही मुलींची खरोखर आत्मीयतेने काळजी घेतली असती... खरंतर आपल्या अडचणीच्या काळातच आपले खरे मित्र कोण हे आपल्याला कळते. निस्वार्थी माणसे आपल्या आयुष्यात असणे हीच आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती असते.. स्वतःच्या पत्नीच्या डोक्यावर केस राहणार नाहीत म्हणून स्वतःच्याही डोक्यावरचे केस काढणारा पती हे वाचून मन अवाक् झाले. जेव्हा केमो सुरू होणार होते.. तेव्हा लेखकाच्या मनात विचार आला की पुढे काही त्रास झाला तर आपण आत्ताच सगळी कामे करून ठेवलेली बरी.. तिची कन्या आरा हीचे दात काढून घेण्यासाठी जाते.. तेव्हा वाचक म्हणून असं वाटतं कितीही नियोजनबद्धता, स्वतःच्या आजाराच्या वेळेस पण मुलांचा विचार फक्त आईच करू शकते.. आपल्या आयुष्यात काय होणार आहे, हे माहीत नसतं पण भरभरून आयुष्य जगण हे तर आपल्याच हातात असतं ना.. असं लेखिका म्हणते, हे पुस्तक वाचून मला कळालं या पुस्तकाला एवढे पुरस्कार का मिळाले आहेत..सरते शेवटी पुस्तकातलं, आणि मला आवडलेलं एक वाक्य सांगावसं वाटतंय "आजार हा फक्त शरीराला होतो.. तो तुमच्या मनाला कधीच होऊ शकत नाही" फक्त आजारपणामध्ये आपण अत्यंत शिस्तबद्ध रित्या व्यायाम, आहार व स्वतःची मानसिकता जपली पाहिजे. पुस्तक अतिशय सकारात्मक आहे, फक्त कॅन्सर पेशंट नाही तर प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे. लेखिकेला तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... सौ. संगीता लोटे. लेखिका - इच्छामरण. #beautyoflife #fightagainstillness #powerofpositivity##strengthandsurvival##cancerwarrior##inspirationalbook #mindovermatter #lifeisbeautiful #diaryofasurvivor #nevergiveup #resilience #hopeandcourage #selfbelief #staystrong #mentalstrength #healingjourney #supportandlove #braveheart #cancerawareness #trueinspiration##sangeetalate##ichamaran##beautyoflife
Image from SwaRa "पुस्तक परिचय": वाचावंअसंपुस्तक  बहुचर्चित "इच्छामरण" पुस्तकाच्या प्रसिद्ध लेखिका संगी...

Comments