SwaRa "पुस्तक परिचय"
SwaRa "पुस्तक परिचय"
February 16, 2025 at 01:20 PM
आदरणीय रा.रं.बोराडे सरांची नवी कोरी बालकादंबरी. #अर्धा_कोयता मी 'अर्धा कोयता' हे पुस्तक वाचले.हे पुस्तक खूप छान आहे. या पुस्तकातून प्राजक्ताची शिक्षणासाठीची ओढ दिसून येते. तिचे आई-वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे प्राजक्ताला नववी शिकता आली नाही. प्राजक्तासारखेच अनेक मुलं- मुली आहेत की, ज्यांना आपल्या गरिबीमुळे आई- वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे शाळा शिकू शकत नाहीत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ खूपच छान आहे. मुखपृष्ठावर प्राजक्ता एका हिरव्यागार झाडाखाली अभ्यास करत बसली आहे. तिच्यापाशी झोपड्या, बैलगाड्या आहेत. बाजूलाच उसाच्या शेतात काही माणसं ऊस तोडत आहेत. शेतांच्या पलीकडे काही घर आहेत. घरापलीकडे एक कारखाना आहे. कारखान्याच्या मागे डोंगर आहे. अशा वातावरणात प्राजक्ता अभ्यास करत आहे. या पुस्तकाचे सुद्धा खूप छान आहे. पाठ पृष्ठावर काही मुले शाळेत जात आहेत. आणि पाठपुष्ठावर डॉ. सुरेश सावंत यांनी खूप छान पाठराखण केली आहे. या पाठराखणेमध्ये डॉ. सुरेश सावंत यांनी या पुस्तकात काय आहे ते थोडक्यात सांगितले आहे. मी सातवीत शिकते. आमच्या मराठीच्या पुस्तकात 'तोडणी' हा धडा आहे. हे पुस्तक वाचल्यावर मला प्राजक्ताची कहाणी या धड्यातल्या मीरा व वसंत सारखीच आहे असे वाटले. मीरा वसंत यांचे आई-वडील सुद्धा ऊस तोडी कामगार असतात. मीरा व वसंत यांना पण शिकण्याची खूप इच्छा असते. त्यांचे आई वडील त्यांना शिकू देत नाही. मग त्यांचे शेजारी त्यांची समजूत काढतात. मग मीरा व वसंतचे आई-वडील त्यांना शाळेत पाठवतात. प्राजक्ताच्या आईने सांगितले तसे खरंच कोणत्या आई वडिलांना आपलं लेकरू शिकू नये असं वाटत नाही. पण प्राजक्ताचे आई-वडील सुद्धा काय करतील. प्राजक्ताला तिथे कोणाच्या इथे ठेवू पण शकत नव्हते. प्राजक्ताच्या आई-वडिलांना सुद्धा खूप वाटायचे की प्राजक्ताने खूप शिकावे. प्राजक्ताला ऊस तोडणीला नेत होते, तर तिच्या मैत्रिणी सुद्धा नेऊ नका म्हणत होत्या. प्राजक्ता एवढी चांगली होती की, तिच्या मैत्रिणींना सुद्धा प्राजक्ता ऊसतोडणीला जाऊ नये वाटत होतं. हे पुस्तक वाचताना मला सुद्धा वाटत होत की, प्राजक्ताने पारगावला राहून शाळा शिकावी पण तसं होऊ शकत नव्हतं. तेव्हा मला खूप दुःख झाले. जेव्हा प्राजक्ता ऊस तोडणीला जात होती. तेव्हा तिच्या डोळ्यातलं पाणी खंडत नव्हतं ना तिच्या मैत्रिणीच्या डोळ्यातलं पाणी खंडत नव्हतं. तेव्हा माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. जेव्हा प्राजक्ताला धानोऱ्याचे शिक्षक शाळेत टाकायचे म्हणून म्हणत होते. तेव्हा मला वाटले आता प्राजक्ता शिकेल. तिचे शिक्षण वाया जाणार नाही.पण जेव्हा ऊस तोडी कामगारांनी आपल्या अडचणी सांगितल्या. तेव्हा रायवाडीकर आणि सोनवटकर उठून परत जाऊ लागले. तेव्हा मला खूप दुःख झाले. सोपानराव जगदाळे यांनी जसे ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी हॉस्टेल काढले. तसे अजून हॉस्टेल निघायला पाहिजेत. कारण ऊसतोडी कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाया जाऊ नये. खूप ऊसतोडी कामगारांच्या मुलांचे राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे शिक्षण वाया जाते. पण जर ऊस तोडी कामगारांच्या मुलांसाठी होस्टेल काढले तर त्यांचे शिक्षण वाया जाणार नाही. हे पुस्तक वाचून मला ऊसतोडी कामगारांचे मुलं शिक्षणासाठी किती धडपडत असतात ते समजले. . पुस्तकाचे नाव - अर्धा कोयता पुस्तकाचे लेखक - रा. रं. बोराडे पुस्तकाचे प्रकाशन - झसाप प्रकाशन पुस्तकाची किंमत - 75₹ पुस्तकाची पाने - 48 ●वैष्णवी सिद्धार्थ मस्के वर्ग-सातवा जि.प.प्रा.शाळा,रायपूर ता.सेलू Raosaheb Borade Sir
Image from SwaRa "पुस्तक परिचय": आदरणीय रा.रं.बोराडे सरांची नवी कोरी बालकादंबरी.  <a class="text-blue-5...

Comments