Krushik App
Krushik App
February 12, 2025 at 05:56 AM
*वाई बाजार समितीत हळदीला १६,१०० रुपये उच्चांकी दर* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 12-Feb-25 सौजन्य : ॲग्रोवन येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची एक हजार पोत्यांची आवक झाली. या हळदीच्या लिलावाचा प्रारंभ किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद दादा शिंदे यांचे हस्ते झाला. या वेळी हळदीचा दर क्विंटलला १३००० ते १६१०० रुपये निघाला आहे.मिठालाल लख्मीचंद जैन यांच्या काट्यावर शेतकरी दत्तात्रेय डेरे यांना १६,१०० रुपये, तर कांतिलाल भुरमल यांच्या काट्यावर शेतकरी अनिल कचरे यांना १६,००० रुपये, पारसमल मदनलाल यांच्या काट्यावर शेतकरी संतोष इथापे यांना १६,००० रुपये, साहेबराव शेलार यांच्या काट्यावर शेतकरी नितीन करपे यांना १६,००० रुपये एवढा दर मिळाला आहे.या वेळी सभापती मोहन जाधव यांनी व्यापाऱ्यांनी हळद लिलाव दर सोमवारी व दर शुक्रवारी नियमितपणे काढावेत. शेतकऱ्यांच्या हळद या शेतीमालास जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करावा. तसेच शेतकऱ्यांनी हळद स्वच्छ करून आणावी. परस्पर बाहेर व्यापाऱ्यांना घातल्यास वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाई मार्केटवरच हळद विक्रीसाठी आणावी असे आवाहन केले.या प्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, उपसभापती विनायक येवले, संचालक रमेश गायकवाड, केशव गाढवे, तानाजी कचरे, राहुल डेरे, पोपट जगताप, रवींद्र मांढरे, श्रीमती शकुंतला सावंत, राहुल वळकुंदे, विवेक भोसले, संजय मोहळकर, दत्तात्रेय बांदल, अशोक सोनावणे, तुकाराम जेधे, नानासो शिंदे, सचिन फरांदे, माजी संचालक राजेंद्र कदम, राजेंद्र सोनावणे,विक्रमसिंह पिसाळ, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मदन भोसले, व्यापारी कांतिलाल भुरमल, दीपचंद ओसवाल, मदन ओसवाल, हेमंत जैन, मिठालाल जैन, शंकरशेठ ओसवाल, मदनलाल ओसवाल, प्रवीण ओसवाल, रवींद्र कोरडे, साहेबराव शेलार, विनोद पावशे, विश्‍वास हगवणे, प्रवीण ओसवाल, विनोद भुरमल, महेश फरांदे, तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते. ➖➖➖ *राज्यातील प्रमुख हळद बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा*. 📱📱📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

Comments