
Krushik App
1.9K subscribers
About Krushik App
कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी
Similar Channels
Swipe to see more
Posts

*पीकविम्याची भरपाई ३७७७ कोटींवर; शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 23-May-25 सौजन्य : अॅग्रोवन ➖➖➖➖➖➖➖ खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. एकूण चार ट्रीगरमधून ही भरपाई मंजूर झाली. मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार आहेत. लवकरच ही भरपाई देखील खात्यात जमा होईल अशी माहीती कृषी विभागाने दिली.खरिप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना एकूण ४ ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. यापैकी राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ताच विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई खात्यात जमा होत आहे. राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळेल.चार ट्रीगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील विमा भरपाईची स्थिती ३ हजार २७९ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर आणखी ४९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US *लातूर विभागातील विमा भरपाईचे चित्र* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक परभणी…४२९.८५…४०३.७७…२६.०७ नांदेड…३६१.४४…२५४.२७…१०७.१६ धाराशीव…२१९.९२…२१८.०२…१.९० लातूर…२४६.६१…२२७.४०…१९.२० हिंगोली…१७८.१९…१७२.७५…५.४३ *छत्रपती संभाजीनगर विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक बीड…२८२.६२…२८२.५३…०.९ जालना…२६३.४०…१६२.४६…१००.९४ अमरावती विभागातील विमा भरपाईची परिस्थिती जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक बुलडाणा…३१८.५६…३१६.१४…२.४२ अमरावती…६१.७८…५०.४६…११.३१ अकोला…९०.४९…७९.५३…१०.९५ *नागपूर विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक वर्धा…१२६.९१…१२५.५७…१.३४ नागपूर…६६.५९...६३.७३…२.८५ भंडारा…०.५२…०.४८…०.४ गोंदीया…०.३४…०.३४…०.३३ चंद्रपूर…४२.६९…३५.९४…६.७४ गडचिरोली…५.४७…३.०६…२.४० वाशिम…८८.४५…८८.४५…० यवतमाळ…१७५.८७…१५२.६९…२३.१८ छत्रपती संभाजीनगर…१२९.७९…१२९.२६…०.५२ नाशिक विभागातील विमा भरपाईची स्थिती जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक नाशिक…११५…७९…३६ धुळे…२८.७६…२२.७३…६.०३ नंदुरबार…२३.८६…२०.८७…३ जळगाव…५५.३३…५१.६८…३.६४ *पुणे विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक अहिल्यानगर…१७१.३६…१४४.१४…२७.२१ पुणे…३.७६…३.३७…०.३८ सोलापूर…२५७.४०…१७४.२२…८३.१८ *कोल्हापूर विभागातील विमा भरपाईची स्थिती* जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक सातारा…४.४०…०.५१…३.८८ सांगली…७.३७…७.३३…०.४ कोल्हापूर…१०.५९…८.०१…२.५८

*आजचा कृषी सल्ला* ➖➖➖➖➖ *केळी पिक* 🍌🍌 पिकांची फेरपालट पिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेण्यामुळे रोगकारक बुरशी आणि विषाणूंचे जीवनचक्र सतत चालू राहते. त्यामुळे उपाययोजना करूनही रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही. यासाठी केळी पिकानंतर केळी पीक घेणे टाळावे. पिकांची फेरपालट करावी. ➖➖➖ *डाळिंब पिक* मृग बहार (मे-जून पीक नियमन) ✨बागेची मशागत 👉🏽बाग विश्रांती अवस्थेत असेल आणि मे महिन्याच्या शेवटी बहार व्यवस्थापन करायचे असल्यास, आपल्या जमिनीच्या मागदुरानुसार झाडांना ताण येण्यासाठी पाणी देणे बंद करावे. भारी जमिनीमध्ये पाच-सहा आठवडे, तर हलक्या जमिनीमध्ये तीन-चार आठवड्यांत ताण येऊ शकतो. 👉🏽बाग ताणावर असताना लवकर मृग बहार घ्यायचे नियोजन असल्यास इथेफॉनचा वापरून पानगळ करून घ्यावी. पानांच्या पिवळसरपणानुसार इथेफॉनचे प्रमाण ठरवावे. 👉🏽योग्य ताणामुळे नैसर्गिक पानगळ झाली असल्यास पानगळीसाठी इथेफॉन वापरू नये. त्याऐवजी इथेफॉन (३९ एसएल) ०.२ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे चौकी तयार झाल्यानंतर फवारणी केल्यास चांगली फुलधारणा होते. 👉🏽बागेतील झाडांची ४०-५० टक्के पाने पिवळी झाली असल्यास पानगळीसाठी इथेफॉन (३९ एसएल) १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. 👉🏽बागेतील झाडांची पाने हिरवी किंवा २० टक्क्यांपर्यंत पिवळी झाली असल्यास पानगळीसाठी इथेफॉन (३९ एसएल) दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी ०.५ मि.लि., तर दुसरी फवारणी पानांच्या पिवळेपणानुसार १-१.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे करावी. 👉🏽बहार कालावधीत इथेफॉन (३९ एसएल) २.५ मि.लि. प्रतिलिटरपेक्षा वापर जास्त नसावा. 👉🏽प्रत्येक इथेफॉन फवारणीसोबत १८-४६-०/ १२-६१-०/ ०-५२-३४ ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळावे. 👉🏽पानगळ झाल्यानंतर, मे महिन्याच्या शेवटी हलकी छाटणी करावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंडयाकडून १०-१५ सें.मी.पर्यंत छाटाव्यात. काटे, वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. 👉🏽जमिनीवर पडलेला पालापाचोळा, काड्या गोळा करून नष्ट कराव्यात किंवा खतासोबत मातीमध्ये गाडाव्यात. ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

औषधी वनस्पती लागवड घटकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. २० : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात ‘औषधी वनस्पती लागवड’ घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ होण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२५ -२६ मध्ये ४ कोटी ४० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी दिलेली आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे पीकनिहाय आर्थिक मापदंड पुढीलप्रमाणे आहेत. ज्येष्ठमध किंवा मुलेठी, शतावरी, कालीहारी किंवा कळलावी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतीकरीता प्रतिहेक्टर १ लाख ५० हजार रुपये; गुलाब, रोझमेरी, निशिगंध,जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर या महाग सुगंधी वनस्पतीकरीता १ लाख २५ हजार रुपये आणि इतर सुगंधी वनस्पतीकरीता ५० हजार रुपये सर्वसाधारण क्षेत्रात ४० टक्के तर अधिसूचित क्षेत्रामध्ये ५० टक्के (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

*मॉन्सून कोकणात दाखल* ⛈️🌧️⛈️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 26-May-25 सौजन्य : अॅग्रोवन ➖➖➖➖➖➖➖ मे महिन्यात सुरू असलेल्या विक्रमी पावसानंतर नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) महाराष्ट्रात दणक्यात आगमन झाले आहे. रविवारी मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. विशेष म्हणजे १९९० नंतर प्रथमच मॉन्सून इतक्या वेगाने महाराष्ट्रात दाखल झाला आहे. १९९० मध्ये २० मे रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल झाला होता.केरळसह, कर्नाटक किनारपट्टीवर आठवडाभर आधीच दाखल झालेला मॉन्सून यंदा ११ दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात पोहोचला आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्राने चाल दिल्याने मॉन्सून प्रवाहाचा वेग अधिक बळकट झाला आहे.रविवारी (ता. २५) मॉन्सूनने कर्नाटकच्या आणखी काही भागासह, संपूर्ण गोवा आणि तळकोकणात मजल मारली आहे. तर पूर्वोत्तर भारतातही मॉन्सूनने वाटचाल सुरूच ठेवली असून, मिझोराम, मणिपूर आणि नागालॅण्ड राज्यात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.यंदा अंदमान बेटांसह देशात मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता. २४) मॉन्सूनने केरळमध्ये धडक दिली होती. रविवारी (ता. २५) देवगड, बेळगावी, हवेरी, मंड्या, धर्मपूरी, चेन्नई तसेच ईशान्य भारतातील कोहिमा पर्यंत मॉन्सून पोचला आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग आणि ईशान्य भारताच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. *१९९० मध्ये सर्वांत लवकर आगमन* १९६० पासूनच्या नोंदीनुसार मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाच्या वेळा लक्षात घेता १९९० मध्ये मॉन्सून सर्वाधिक लवकर म्हणजेच २० मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यापूर्वी १९६२ मध्ये, तसेच यंदा मॉन्सून २५ मे रोजी महाराष्ट्रात धडकला आहे. १९७० मध्ये २९ मे रोजी तर १९७१ आणि २००६ मध्ये ३१ मे रोजी मॉन्सून महाराष्ट्राच्या भूमीवर पोचला होता. मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वेगवान आगमन ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US *वर्ष--तारीख* १९९०---२० मे १९६२---२५ मे २०२५---२५ मे १९७०---२९ मे १९७१---३१ मे २००६---३१ मे

*पावसाने 26 हजार 165 हेक्टरवरील पिकांचे नुकसान* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनांक : 22-May-25 सौजन्य : पुढारी ➖➖➖➖➖➖➖ राज्यात अवेळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे 25 जिल्ह्यातील सुमारे 26 हजार 165 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी हंगामातील पिके, फळे आणि भाजीपाला पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसल्याचे कृषी विभागाच्या नजर अंदाजित ताज्या अहवालातून समोर आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास नुकसान क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यताही अधिकार्यांनी वर्तविली.पिकांच्या झालेल्या नुकसानीमध्ये भात, मका, कांदा, भाजीपाला, बाजरी, ज्वारी, तीळ, उन्हाळी मुग, भुईमूग शेंगेचा समावेश आहे. या शिवाय संत्रा, केळी, जांभूळ, आंबा, चिक्कू, डाळिंब, पपई, मोसंबी आणि भाजीपाला या पिकांच्या समावेश आहे.अवेळीच्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे.त्यामध्ये पालघर 796, रायगड 17, ठाणे 1, नाशिक 2023, धुळे 645, नंदुरबार 69, अहिल्यानगर 749, पुणे 610, सोलापूर 359, सातारा 14, जळगांव 4396, धाराशीव 68, जालना 1695, परभणी 229, नांदेड 7, बुलढाणा 488, अमरावती 11796, यवतमाळ 247, वाशीम 203, वर्धा 113, नागपूर 42, चंद्रपूर 1038, भंडारा 75, गोंदिया 143 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 342 हेक्टर मिळून एकूण 26 हजार 165 हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसला आहे. ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

*खरीप हंगामासाठी बियाणे kvk बारामती येथे उपलब्ध* https://youtube.com/shorts/QhX42MMmNx4