Krushik App
Krushik App
February 13, 2025 at 11:52 AM
*आजचा कृषी सल्ला* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संत्रा-मोसंबी-लिंबू* 🍊🍋🍋‍🟩 अंबिया व मृग बहार व्यवस्थापन आंबिया बहारातील फळगळ रोखण्यासाठी जिबरेलिक अॅसिड दीड ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. या महिन्यात मृग बहाराची फळ काढणी सुरू होईल. योग्य पक्वतेच्या फळांची काढणी करून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवावी. मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील साल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सी क्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ➖➖➖ *केळी पिक सल्ला* कांदेबाग व्यवस्थापन 👉🏽ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या बागा सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहेत. 👉🏽या बागांना वेळापत्रकानुसार खतांची मात्रा द्याव्यात. जमिनीतून खते देताना प्रति एक हजार झाडांना युरिया १३ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ५ किलो या प्रमाणे प्रत्येक आठवड्याला द्यावे. ड्रीपमधून खते देताना प्रति एक हजार झाडांसाठी युरिया १३ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो प्रमाणे द्यावे. 👉🏽प्रति झाड प्रति दिन ४.५ ते ६.५ लिटर ठिबकद्वारे पाणी द्यावे. 👉🏽बागेतील तसेच बांधावरील तण काढून बाग स्वच्छ ठेवावी. ➖➖➖ *राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा.* 📱📱📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

Comments