
प्रबुद्ध टीव्ही
February 10, 2025 at 04:05 AM
*७ नोव्हेंबर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन!*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या *शाळा प्रवेश दिनानिमित्त* केवळ *व्हॉट्सॲप स्टेटस* ठेवून शुभेच्छा देणे ही *योग्य पद्धत नाही*. खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा करण्याचा *उत्तम मार्ग* म्हणजे *त्यांच्या नावाने समाजाच्या मालकीची एक शाळा स्थापन करणे!* प्रत्येक वर्षी *७ नोव्हेंबर रोजी एक शाळा निर्माण करणे* हेच या दिवसाचे *योग्य प्रतीक* ठरेल.
केवळ *घोषणाबाजी आणि जयघोष* करून *७ नोव्हेंबर साजरा करणे* म्हणजे फक्त *भावनिक उत्सव* साजरा करणे होय. जर आपण *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी* असू, तर *त्यांच्या विचारांवर कृती करणे आवश्यक आहे*. हा दिवस *त्यांच्या शिक्षणक्रांतीला समर्पित* करून *समाजासाठी शाळा निर्माण करणे* हीच *खरी आदरांजली* ठरेल.
आपण केवळ *बाबासाहेबांच्या नावाचा उदो-उदो* करून थांबतोय का? की *त्यांच्या विचारांनुसार शिक्षणप्रसारासाठी काही ठोस पावले उचलतोय?* बाबासाहेबांनी आपले *संपूर्ण आयुष्य संघर्ष आणि कार्यासाठी वाहिले*. आपणही *त्यांच्या विचारांनुसार कृतीशील होण्याची गरज आहे*.
जर आपण *त्यांचे खरे अनुयायी* असाल, तर *या कार्यात संघटित व्हा, एकत्र या, विचार-विमर्श करा आणि त्यावर ठोस कृती करा*. *बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणण्याचा हा खरा मार्ग आहे*.
*७ नोव्हेंबरच्या दिवशी स्टेटस ठेवणाऱ्या प्रत्येकाने आता स्वतःला विचारावे – मी बाबासाहेबांच्या शिक्षणक्रांतीसाठी काय करत आहे? केवळ घोषणा देणार की प्रत्यक्ष कृती करणार?*
*-- प्रवीण दीपक जामनिक ✍🏻*
(सम्यक धम्मचर्चा अभियान – समाज उन्नतीचे स्वप्न घेऊन उभे राहिलेले संघटन)
📞 *7447755627*
❤️
🙏
👍
💙
💯
14