
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 12, 2025 at 04:37 PM
https://www.facebook.com/share/p/12F8HSpcyJe/
गडचिरोलीच्या फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचे तळ उध्वस्त करतानाच्या चकमकीत सी-६० पथकातील पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार यांना दुर्दैवाने गोळी लागली. ते जखमी अवस्थेत असतांना त्यांना ताबडतोब हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर अनखोडा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. त्यांच्या कुटुंबीयांना महायुती सरकारकडून विविध लाभांसह २ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येत आहे. नक्षलमुक्त भारताच्या अभियानात नागुलवार यांच्या शौर्याला आमचा सलाम.
❤️
1