Adv.Ashish Jaiswal
Adv.Ashish Jaiswal
February 13, 2025 at 05:09 AM
https://www.facebook.com/share/p/15cdVNWgpp/ गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा वार्षिक योजना बैठकीला उपस्थित राहून सन २०२४-२५ अंतर्गत माहे ११ फेब्रुवारी, २०२५ अखेर खर्चाचा आढावा घेतला. महायुती सरकारच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होत आहे. त्यादृष्टीने वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, जलसंधारण आणि मानव विकास यांसारख्या विभागांशी संवाद साधून माहिती घेतली. जिल्ह्याच्या विविध वाढत्या मागणीनुसार आवश्यक गरजा ओळखून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधने आवश्यक आहे. हेच ध्येय ठेवून त्या पुरवठ्याच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले. गडचिरोलीतील नक्षलवाद ही ओळख आता संपुष्टात येत असून रोजगारक्षम गडचिरोली म्हणून विकसित होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या वृद्धीसह, रोजगारातून महिलांचे व युवकांचे सक्षमीकरणाबाबत सूचना दिल्या. याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषद सीईओ सुहास गाडे, डीपीओ श्रीराम पाचखेडे, वन अधिकारी मिलेश शर्मा, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग नमन गोयल व जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख बैठकीत उपस्थिती होती. (१२ फेब्रुवारी २०२५) Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar

Comments