Adv.Ashish Jaiswal
Adv.Ashish Jaiswal
February 13, 2025 at 09:00 AM
https://www.facebook.com/share/p/15aBt49aTN/ गडचिरोलीतील वन पर्यटनाला चालना देण्यसाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि गडचिरोली वन विभागामार्फत मागील तीन वर्षापासून गुरवडा नेचर सफारी सुरू करण्यात आली आहे. आज या गुरवडा नेचर सफारीला भेट देऊन जंगल सफारी केली. सफारी दरम्यान नारळी गोटा, पुरातन वस्तू, पातर गोटा, अस्वल हुडकी गुफा, ढोली गोटा आणि वाघडोह परिसराची पाहणी केली. पर्यटकांसाठी जंगलातील व्हिव पॉईंट्ससह पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि अडचणींबाबत वन विभागाकडून माहिती घेतली. गडचिरोलीच्या वन पर्यटन वाढीच्या दृष्टीने वन विभागाला महायुती सरकारच्या माध्यमातून अधिक निधी उपल्बध करून पर्यटनाच्या वृद्धीसाठी कायम प्रयत्नशील आहे. यातून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावा यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. #gadchiroli #गडचिरोली #गडचिरोली_वन_पर्यटन Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar

Comments