Adv.Ashish Jaiswal
Adv.Ashish Jaiswal
February 13, 2025 at 03:54 PM
https://www.facebook.com/share/p/166jEehnXy/ गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयात आज कौशल्य स्पर्श क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांवर संबोधन केले. यावेळी कौशल्यस्पर्श पुस्तकाचे प्रकाशन करत विद्यापीठाच्या प्रगती करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासित केले. भविष्यातील देश, महाराष्ट्र घडवण्याचे राज्यकर्त्यांचे व्हिजन असते. त्याचप्रमाणे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे काम करते. गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी घेतल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रमुख ५० संकल्प केले आहेत. त्यातील पहिला संकल्प गोंडवाना विद्यापीठ विकसीत करण्याचा आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने भविष्यात गडचिरोली हे महत्त्वाचे केंद्र होईल. राज्यात आतापर्यंत गडचिरोलीचे नाव शेवटच्या क्रमांकात घेतले जाते. परंतु, उद्या गडचिरोली पहिल्या क्रमांकावर राहणार, असा विश्वास आहे. याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, प्राचार्य डॉ. कृष्णा कारू आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments