
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 16, 2025 at 03:34 AM
https://www.facebook.com/share/p/1ArZTdyhuE/
📍जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
◆ नागपूर चित्रनगरी आढावा बैठक -
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांच्या समवेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे प्रस्तावित चित्रनगरी आढावा बैठकीस उपस्थित राहिलो.
रामटेक येथे भव्य चित्रनगरी उभारल्याने नागपूर - विदर्भाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे, हे लक्षात घेऊन या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
सदर बैठकीत महसूल विभागाकडे असलेली १२८ एकर जागा सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणे, चित्रनगरीच्या जागेचा ताबा, आराखडा व नियोजन यासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे, सिनेमाशी संबंधित तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देणारी संस्था उभारणे, चित्रनगरीत जास्तीत जास्त चित्रीकरण होण्यासाठी सवलत योजना तयार करून मसुदा सादर करणे या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#रामटेक #चित्रनगरी #आशिषजयस्वाल