
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 16, 2025 at 03:38 AM
https://www.facebook.com/share/p/1AvscQc87K/
📍नियोजन भवन, नागपूर
नागपूरच्या नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समिती सभा (दिशा) केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री मा.ना.श्री. Nitin Gadkari जी साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नागपूर उपजीविका उपक्रमाच्या माध्यमातून मिशन २५,००० पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महायुती सरकार सतत प्रयत्नशील आहे. नागपूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या अर्थ सहाय्याने उमेद अभियानातून आंभोरा येथील कर्तव्य महिला ग्रामसंघ महिलांना ‘फिरते ताजे मासे विक्री केंद्र’ गाडीचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सूचना केल्या. सर्व कामे गतीने आणि उत्तम दर्जाची करावीत.
तसेच योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामात दोष आढळून आल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.