
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 19, 2025 at 02:35 AM
https://www.facebook.com/share/p/1AAytYqPUw/
📍बाळासाहेब भवन, मुंबई
१८ फेब्रुवारी, २०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी जनसामान्यांच्या प्रश्नांचे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांवर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. आठवड्यातील तीन दिवस मुंबईतील शिवसेना पक्षाच्या बाळासाहेब भवन या मध्यवर्ती कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. आज नियोजित वेळापत्रकानुसार जनता दरबारात उपस्थित राहून जनसामान्यांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले. जनतेचे प्रश्न निकाली लावून त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना पक्ष आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.
#janatadarbar #जनता_दरबार
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Shivsena - शिवसेना