
Adv.Ashish Jaiswal
February 19, 2025 at 04:31 PM
https://www.facebook.com/share/p/15QNiVeFsq/
📍पारशिवनी, रामटेक
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत पारशिवनी येथील युवा किसान मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीला आज भेट दिली. यावेळी बैलगाडी चालविण्याचा आनंद घेतला.
बैलांचे शौर्य, ताकद आणि परंपरा कायम ठेवण्यासाठी शेतकरी बांधव, बैलजोडीचे चालक-मालक आणि युवक किसान मित्र मंडळाकडून बैलगाडा शर्यतीसाठी घेण्यात येणाऱ्या मेहनतीबद्दल विशेष कौतुक आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी अशा पद्धतीची स्पर्धा झाली पाहिजे, यासाठी आमदार निधीतून तरतूद करण्याबाबत यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेबांची चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रेम भोंडेकर, भगवान गदरे, राहुल ढगे, रोशन पिंपळामुळे, सागर सायरे, अश्विन खोब्रागडे, राहुल मेंघर, डॉ. इरफान अहमद, राहुल नाखले, खुशाल कापसे, मयूर पालीवाल, नरेंद्र बावनकुळे आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
#shivjanmotsav2025
#शिव_जयंती_2025
#शिवजन्मोत्सव
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar