Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
Adv.Ashish Jaiswal - ना.आशिष उमादेवी नंदकिशोरजी जयस्वाल
February 22, 2025 at 01:29 AM
https://www.facebook.com/share/p/1BDV719634/ #शिवसेना पक्षाची आभार सभा आज #रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान येथे पार पडली. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील शिवसेनेचा हा गड अभेद्य राखाल्याबद्दल रामटेक येथील मतदारांचे जाहीर आभार मानले. सभेच्या सुरुवातीला उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख राजू हरणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल हे विक्रमी मतांनी विजयी झाले तसेच शब्द दिल्याप्रमाणे मी त्यांना मंत्री केले, त्यामुळे येथील मतदारांसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. काही जण स्वतःला 'धक्कापुरुष' म्हणवून घेण्यात आंनदी आहेत पण लोकं आपल्याला सोडून का जात आहेत याचे आत्मचिंतन मात्र ते करायला तयार नाहीत. त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही 'जोर का धक्का' देऊन कायमचे घरी बसवावे असे आवाहन यावेळी केले. विदर्भासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक योजना राबविल्या. शेतकरी सन्मान योजना असेल, येथील सिंचन प्रकल्पाना गती असेल, 'शासन आपल्या दारी' उपक्रमाद्वारे अनेक योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांना देणे असेल असे अनेक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. महायुती सरकारच्या काळात ४५ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केल्याचे यासमयी नमूद केले. आशिष जयस्वाल यांनी 'आरोग्यसेवा आपल्या दारी' सारखा उपक्रम यशस्वी केला, ग्रामीण भागात रस्ते केले, गावोगावी शासकीय योजना पोहचवल्या त्यामुळे येथील मतदारांनी त्यांना विजयी केले. आपल्या कार्यकाळात त्यांना २ हजार कोटी रुपये विकासनिधी दिला, तर विदर्भातील पोहरादेवी देवस्थानसाठी ७५० कोटी रुपये दिले असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, संदीप बिटकेलवार, मंगेश काशीकर, वरदराज पिल्ले, शिवकुमार यादव, राज दांडेकर, सुभाष नवले, करुणा अस्थनकर तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक आणि रामटेक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #shivsena #nagpur #eknathshinde #maharashtra #aabhardaura #aabharsabha Shivsena - शिवसेना Sanjay Rathod-संजय राठोड Adv. Ashish Jaiswal Krupal Balaji Tumane

Comments