
Yuti's Hub Library
February 20, 2025 at 10:47 AM
कथा
बाॅइज रिटन टोंगा ( एक साहसी आणि अद्भभुत कथा )
भाग २०
रात्र जशी वाढत होती तस अंधारही वाढत होता.
https://www.shrutimundada.com/2021/08/10-effective-ways-to-relieve-stress.html
बाहेरचच काय गुहेतलही काही दिसत नव्हतं.ते दोघे एकमेकाचा हात धरून बसले होते. बसता बसता ते दोघे झोपी गेले.मध्यरात्री कधीतरी ऐगेतेने डोळे उघडले. गुहेच्या दारात कोणीतरी बसले होते तेही दोघे.त्यांची आकृती भयानक दिसत होती. ऐगेतेच्या तोंडून चिख निघणार तेवढ्यात त्याने आपल्या तोंडावर हात दाबला.त्याला फेरास चे शब्द आठवले."ओरडू नको,आवाज करू नको. आपल्याला पकडून नेतील."
त्याने घाबरून चड्डी ओली करून घेतली.अंगाखाली सगळं ओल झालं. झालं अस कि पावसामुळे दोन माकडं दारात येऊन बसले होते. आकाराने ते खूप मोठे होते.आकार अवाढ्यव होता.त्यांनाही गुहेतलं काही दिसत नव्हतं. फेरासला तर काहीही माहित नव्हतं. तो शांत झोपला होता.ऐगेतेने ही घाबरून डोळे बंद करून घेतले.तो रात्रभर झोपला नाही.त्याला वाटतं होते.बाहेर जो कोणी बसलं आहे ते पकडून नेतील. सकाळ झाली पहाटेचे थंड वारे सुटले होते. बाहेर उजेड वाटतं होता.ऐगेतेने हळूच डोळे उघडून बघीतले,गुहेच्या दारात जे बसले होते ,ते निघून गेले होते. ऐगेतेने हळूच बाहेर बघीतले ,बाहेर कोणी नव्हते.त्याने लगेच फेरासला उठवले आणि लवकर बाहेर यायला सांगितलं.
" फेरास चल लवकर इथून ,अरे रात्री दारात कोणीतरी भयानक बसलं होतं. नशीब आपण त्यांना दिसलो नाही.नाहीतर रात्रीच आपला प्रोग्राम झाला असता."
"ऐ लवघीचा वास का येतोय?"
" अरे माझीच झाली ना घाबरून चड्डीत.रात्री किती घाबरलो मी. हे बघ इथे त्यांचे ठसे पण दिसून येत आहेत. "
फेरासने पाहिलं, तो घाबरला.ते गडबडीने तेथून निघाले.थोडावेळ चालून गेल्यावर त्यांना भुक लागली.त्यांनी फळे शोधून खाल्ली.पाणी प्यायला नव्हतं पण रात्रीच्या पावसाचे पाणी खड्ड्यात जमलेले होते.तेच थोडे त्यांनी पिले.ऐगेतेला परत पोट खराब व्हायची भिती वाटतं होती. ते आता एकदम सरळ कड्यावर चढू लागले.पण पावसाने घसरण झाली होती. चढता चढता ऐगेतेचा पाय घसरला आणि तो घरगंळत खाली जाऊ लागला.फेरासने त्याला पकडन्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला.ऐगेते घसरून दरीत पडला पण दाट झाडीत अडकला.एक हात झाडाला आणि एक कपारीला.एकही हात जरी सुटला तर तो सरळ दरीत पडला असता.
" फेरास मला वाचव ,मला मरायचे नाही." फेरासला मात्र काय करावे कळतंच नव्हते. ऐगेते जोरजोरात रडत होता. फेरासला काही मार्ग दिसत नव्हता.
क्रमशः
सौ हेमा येणेगुरे पुणे
❤️
👍
😮
4