
Yuti's Hub Library
1.8K subscribers
About Yuti's Hub Library
https://www.shrutimundada.com/?m=1 stay tuned 😎
Similar Channels
Swipe to see more
Posts

चिडलेली पत्नी आपल्या शिक्षक नवऱ्याला म्हणाली, "तुम्ही मला कधीच बाहेर जेवायला नेत नाही… आज रात्री आपण बाहेर जेवायला जाऊया." मास्तर – "ठीक आहे, जवळच्या हॉटेलमध्ये जाऊ." पत्नी – "नाही… एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊ." मास्तर – (एक क्षण विचार करून) "ठीक आहे… संध्याकाळी ७ वाजता निघूया." ठीक ७ वाजता दोघं गाडीतून निघाले… रस्त्यात मास्तर म्हणाले – "तुला माहितीये का… एकदा मी माझ्या बहिणीसोबत पाणीपुरीची स्पर्धा केली होती. मी ३० पाणीपुरी खाल्ल्या आणि तिला हरवलं." पत्नी – "अरे, एवढं काय कठीण आहे त्यात?" मास्तर – "माझ्यासारख्या माणसाला पाणीपुरी स्पर्धेत हरवणं फार अवघड आहे." पत्नी – "मी तुम्हाला सहज हरवू शकते." मास्तर – "अगं ते तुला शक्य नाही…" पत्नी – "स्पर्धा करायचीच आहे आता!" मास्तर – "म्हणजे तू स्वतःला हरलेलं बघायचं ठरवलं आहेस का?" पत्नी – "चालेल, बघूया मग!" ते दोघं एका पाणीपुरी स्टॉलवर थांबले आणि स्पर्धा सुरु केली... २५ पाणीपुरींनंतर मास्तरांनी खाणं थांबवलं. पत्नीचं पोटही भरलं होतं, पण तिनं एक पाणीपुरी जास्त खाल्ली आणि ओरडली, "तू हरलास!" बिल आलं – ₹१०० मास्तर – "चला, आता हॉटेलमध्ये जेवायला जाऊया." पत्नी – "नाही आता पोटात जागाच नाही उरली… चला घरीच जाऊ ." (दोघं घरी परतले) पत्नी मात्र ‘मी जिंकले ’ या समाधानात खूश होती. 😜😜😜 आणि मास्तर तिच्या कडे बघून गालातल्या गालात हसत होते, "चला बुवा...१०० रुपयात उरकलं "😜😃 लक्षात ठेवा.... "एक शिक्षक फक्त अभ्यास शिकवत नाही… कधी कधी घरात 'बजेट'ही शिकवतो… ते पण मोठ्या हुशारीने! 😂😂 Weekend special😀😀

कथा त्रिकाल सत्य - एक गुपीत भाग ७ आज शुभदाला खूप भिती वाटतं होती.कारण वाड्यात काम करणारे गडी सासू मेल्या पासून कमी झाले होते. एक दोनच कामाला येत होते.गंगूबाई मात्र दररोज येत होती.पण आज सासरे व लेकर घरी नव्हते.नवरा काल पासून गायब होता.आज रात्री शुभदा वाड्यात एकटीच होती.तिने गंगूबाईला झोपायला बोलवले पण तिने स्पष्ट नकार दिला. गड्यांनाही वाड्यातच झोपायला सांगितले.पण ते घाबरून नको म्हणाले.आज पोर्णिमा होती.शुभदा शेवटी जगत गुरुजीं कडे गेली. ते म्हणाले, तु घाबरू नको,पाहिजे तर मी वाड्यात बसून जप करेन तु शांत झोप.पण शुभदाला झोप कसली येते.वरून बाळाचीपण भिती वाटतं होती.दिवसा शांत शांत असणार बाळ रात्री आठ दिवसाचं वाटतचं नसे.इतक विचित्र वागायचे कि एखाद्या ने त्याला चालताना पाहिले तर ह्र्दय विकाराने मरेलचं.एवढा तिव्र झटका येईल त्याला.शुभदा आज तिच्या खोलीत गेलीच नाही.तिने देवघरात चटई टाकली आणि झोपली.बाळ देवघरा पर्यंत आलं आणि परत गेलं.कारण ते आत येत असताना त्याला तिव्र झटका बसला.ते रागात बघत निघून गेलं.दुरवर जाऊन खि खि हसू लागलं.मग हळूहळू तळघराच्या पायऱ्या उतरून खाली गेल.थोड्या वेळाने बाळाच्या हसण्याचा, खेळण्याचा आवाज येऊ लागला.शुभदाने गळ्यात जगत गुरुजींनी दिलेला गंडा बांधला आणि हळूच ती तळघराकडे गेली.तिने वाकून पाहिले तर बाळ त्या अभद्राच्या मांडीवर खेळत होते. ते अभद्र आपल्या असंख्य जिभा काढून त्याला चाटत होतं.त्यामुळे ते हसत होतं. शुभदाला ते किळसवाणे वाटतं होते.तसेच तिला भितीही वाटतं होते.ती पळतचं देवघरात गेली आणि लटलट कापत डोळे बंद करून पडली.घाबरून झोप तर येत नव्हती.रात्रीच्या शांततेत जगत गुरूजींचा आवाज घुमत होता.मध्य रात्र झाली आणि त्या अभद्राच्या ओरडण्याचा आवाज येत होता. सुभाष त्याला ओढून नेत होता आणि ते जायला तयार नव्हते.तसेच एका हातात बाळाला पकडले होते. सुभाष ते बाळ काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. बाळाला ओढलेलं त्या अभद्राला आवडत नव्हतं. सुभाषला लवकरात लवकर त्या अभद्राला वाड्यातून बाहेर काढायचं होतं. पोर्णिमा तीन नंतर संपणार होती.सुभाष पण काहीतरी मंत्र म्हणत होता.वाड्यात जोरजोरात आवाज होत होता. बाहेर गावात काहीच आवाज येत नव्हता. शुभदा तर देवाला पकडून बसली होती. तेवढ्यात सुभाष ची जोरात आरोळी ऐकायला आली.शुभदा घाबरून बाहेर आली.पाहते तर काय ते अभद्र सुभाषला उचलून भिंतीवर आपटत होता.तरीही सुभाष मंत्र म्हणायचा थांबत नव्हता.सुभाषच्या डोक्यातून रक्त वाहत होते.शुभदाला काही कळाले नाही. ती पळतचं देवघरात गेली आणि देव्हाऱ्यात ठेवलेल गंगाजल उचल्लं आणि बाहेर येऊन त्या अभद्राच्या अंगावर फेकलं.ते अभद्र जळाल्या सारखे ओरडले आणि बाळ व सुभाषला टाकून तळघरात निघून गेलं. बाळही पाणी अंगावर पडल्याने चिरकत होतं.सुभाष मात्र तिच्या कडे रागात पाहत होता. " काय केलसं हे ,मी त्याला वाड्रा बाहेर काढत होतो.थोड्स लागला मला तर चाललं असतं .पण हे भंयकर धुड काय करेल माहित नाही. सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलस.काय टाकलस हे सगळं शरीर जळजळतयं." " गंगाजल" " मुर्ख आहेस का? काहीही करत बसतेस." एवढं म्हणून सुभाष बाळाला शुभदा कडे देऊन परत तळघराकडे गेला.बाळ डोळे लाल करून जाणाऱ्या सुभाष कडे पाहत होते.शुभदा च्या हातात अजूनही गंगाजलची वाटी होती.तसेच असताना बाळाला तिच्या हातात दिले.बाळाला त्या वाटीचा पाठीला चटका बसला बाळ पटकन खाली उडी मारून आपल्या खोलीत निघून गेले.समोरच्या ओसरीत बसलेले जगत गुरू आश्चर्याने त्याच्या कडे पाहत होते. ते पटकन उठले आणि शुभदाकडे आले. " बघं शुभदा,तुला म्हटलों होतो ना कि हे बाळ साधारण नाही.त्या अभद्रा चे मुलं आहे.कोणते बाळ पंधरा दिवसात आपल्या पायावर चालत जाते किंवा टुणकन उडी मारते." " हं" शुभदा अजूनही धक्क्यात होती. तिचे तर डोके चालत नव्हते.दोन वाजून गेले होते. झोप नसल्याने डोके दुखत होते.अजून पुढ्यात काय वाढून ठेवलय हे तिलाही माहित नव्हते. ती हताश होऊन देवघरात निघून गेली. क्रमशः सौ हेमा येणेगूरे पुणे

Follow the Yuti's Hub Library channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y

कथा त्रिकाल सत्य - एक गुपीत भाग ८ शुभदाला आपल्या नवऱ्याचं व मुलाचं गुपीत कळाल्याने नाराज होती. इतक्या वर्षाने तिला मुलगा झाला होता. आता नवऱ्याचे व सासूचे टोमणे कमी होतील. नवरा दुसरे लग्न करायचा विचार करणार नाही. आता सगळं चांगले होणार या आनंदात असताना आपला नवरा व मुलगा मानवी नसून अमानवी आहेत.आपण अशा नवऱ्या सोबत दहा वर्ष संसार केला.आता मुलगाही तसलाच नव्हेतर त्या पेक्षाही भयकंर निघाला. ती आतून नाराज झाली. कितीतरी वेळ ती विचार करत बसली आणि जेंव्हा तिचे डोळे उघडले तेंव्हा सकाळचे दहा वाजले होते. गंगूबाई तिला आवाज देत होती. "आव बाई साब बाळ कुठ हाय जी.त्याला तेल लावून अंधुळ घालते.तुम्ही असे देवघरात झोपलासा,बाहेर ओसरीत जमीनीवर तसेच मालक झोपलेती.मग बाळ कुठ हाय " " ते खोलीत पाळण्यात आहे." " नाही जी,मी तिथं जावून आले." ती आणि शुभदा बोलत असताना, जगत गुरुजींचे बोबडे बोल ऐकू आले.तिकडे पाहिले तर जगत गुरुजींच्या समोर खाली जमिनीवर संतरजीवर बाळ झोपले होते. ते मस्त हसत खेळत पाय हात हलवत होते. गुरुजी त्याला खेळवत होते.रात्री जे बाळ पाहिले ते आता मुळीच नव्हते.गुरूजींनी त्याच्या हातात, पायात व गळ्यात कसले तरी ताईत बांधले होते.तरीही ते बाळ शांत होते.म्हणजे त्या बाळावर दिवसा त्या अभद्रा ची छाया पडत नसे.शुभदाला वाटतं होते.काहीतरी असे घडावे आणि आपल्या बाळाच्या अंगातून ते अभद्राचे अंश निघून जावे.आपले बाळ आपल्याला मिळावे.पण ते कसे शक्य होणार होते.अजून रंगय्या स्वामी पण आले नव्हते.ते आल्या वर अजून काय काय घडणार होते.तेवढ्यात वाड्या बाहेर गलका ऐकू आला.सुभाष ,शुभदा व जगत गुरुजी बाहेर पळाले.बाहेर नारायणची बायको छाती बडवून रडत होती. " अहो मालकीन बाई तुमच्या नवऱ्याला सांगा बर,गुमान माझ्या मुलाला परत दे म्हणून. कुठ हाय ते सांगा म्हणाव.काल रातीला कसलीतरी पुजा करायची म्हणून त्याला नेले होते. पुन्हा तो परत आलाच नाही.यो भुत हाय भुत.रातीला स्मशानात पुजा करतयं.ह्यानंच माझ्या मुलाला गायब केलंय. " " ओ शांता काकी ,तुमचा मुलगा माझ्या सोबत आला होता.पण पुजा झाल्या वर आम्ही गावात परत आलो.तो आपल्या घरी गेला मी माझ्या घरी आलो.मी काहीही केलेलं नाही. बघा असेल इथेच कुठे.किंवा गावात आधीच लोक गायब होतं आहेत.तो पण झाला असेल. उगीच माझ्या वर आळ घेतायं" ती शिव्या शाप देत तेथेच थांबली. खर तर सुभाषने त्याला नको म्हणत असताना बळजबरीने वशीभुत करून नेले.नेताना त्याला वाटले कोणी पाहिलं नाही.कारण तो ऐकटाच घाबरत घाबरत बाहेर शौचाला जात होता.तेवढ्यात त्याची आईही त्याला पाहण्यासाठी बाहेर आली.तिने आपल्या मुलाला त्याच्या मागे मागे जाताना पाहिले. पण सुभाषने त्याला स्मशानात नेऊन पुजेसाठी बळी दिला होता. पुजावेदीवर त्याचे रक्त चढवले होते.पुजा झाल्यावर त्याचे शरीर उचलून आणून त्या अभद्रा समोर फेकले होते.त्याने त्याला कडकड फोडून खाल्ले होते.यात सुभाष खुप थकला होता.त्याला पायऱ्याही चढता येत नव्हत्या. तो कसाबसा ओसरीवर चढला आणि तेथेच झोपी गेला. शुभदाला माहित होते कि एकतर नवऱ्याने काहीतरी केले किंवा त्या अभद्रा ने खाल्ले. ती गुपचुप आत निघून गेली.सुभाष परत तयार होऊन कोठेतरी निघून गेला. दिवस असाच निघून गेला. आजही जगत गुरुजी जप करण्यासाठी वाड्यात आले.रात्र वाढत गेली आणि बाळ जोरजोरात चिरकू लागले.रडू लागले.बाळाच्या सर्वांगाची आग होत होती. आग लागल्या सारखे हात पाय,गळा दिसत होते.जगत गुरुजींच्या दोऱ्याने ते होतं होते.ते बाळ धडपडत तळघराकडे गेले.शुभदा जोरात ओरडली.संकेत बेटा थांब जाऊ नको खाली.आज तिने बाळाला नाव दिले. पण ते न ऐकता खाली गेले.शुभदा भारावल्या सारखी त्याच्या मागे गेली.आत पाहते तर काय बाळ आपली आग शांत करण्यासाठी त्या अभद्राने आणलेल्या मानवाचे रक्त पीत होते.शुभदा जोरात किंचाळली व बेशुद्ध होऊन पडली.ते अभद्र पळतच तिच्या कडे आले पण काहीही न करता परत गेले.थोड्या वेळानी तिला शुध्द आली आणि ती पळतच वर आली.ती घाबरून देवघरात जाऊन बसली. क्रमशः सौ हेमा येणेगूरे पुणे

!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - ४२. आनंदी पुटपुटत म्हणाली, माझ्या मनावर फार ताण पडलाय होऽ! कळायला लागल्यापासूनच आहे. रोसेलहून निघाले तेव्हापासून रडावेसे वाटत होते. मावशी दिशेनाशी झाली तेव्हा तर हंबरडा फोडावासा वाटला. पण.. पण.. तुमची फार भीती वाटते. त्या धास्तीने रडली नाही. पण आता शेवटची वेळ आली. आता धास्तीही संपली. ती मोकळेपणे रडू लागली. गोपाळरावांनी डोळे पुसले. बायकोला थोपटत राहिले. बाहेर लाटांचा धिंगाणा चालू होता. वादळाचा वेग भयंकर होता. बोट खाली वर होत होती. गोपाळराव तिचे कपाळ चेपीत होते. तिला ग्लानी आली. किती वेळ गेला कुणास ठाऊक? वादळ संपले होते. लाटांचे तडाखे थांबले होते. लाटा शांत झाल्या होत्या. खूप वेळाने ती जागी झाली. उन्हे पडली होती. मनाला फार प्रसन्न वाटत होते. गोपाळराव म्हणाले, तुला छान झोप लागली होती. ती म्हणाली, आज मला बरं वाटतंय! आता मी मरत नाही. मी नक्की जगेन.... गोपाळरावांनी तिच्या चेहऱ्याकडे बघितले. एक वेगळीच टवटवी दिसली. त्यांचे मन चरकले. चेहरा टवटवीत होणे बरे नाही. व्यथित मनाने त्यांनी औषधाचा डोज दिला. म्हणाले, स्वस्थ पड. ती म्हणाली केसांच्या किती जटा झाल्या. केस विंचारायला हवेत. गोपाळ रावांनी फणी काढून तिच्या जटा काढू लागले. पण जमले नाही. केस तुटायला लागले. मग ती म्हणाली, मला उठून बसवा. मीच विंचरते. तिने हट्ट केल्यामुळे उठून बसवले. ती फणीने जटा काढू लागली. पंधरा-वीस मिनिटातच ती भयंकर थकली. छाती वाजायला लागली. फणी हातात तशीच ठेवून अंथरुणावर कलंडली. तिला ब्रांडीचा डोस दिला. स्वस्थ निजण्यास सांगितले. नंतरचे पंधरा-वीस दिवस बरे गेले. ताप होताच. शरीर थकले होते. पण तिच्या मनाला उत्साह होता. डेकवर आराम खुर्चीत बसून पुस्तक वाचण्यात वेळ जात होता. बोट एकदाची लिव्हरपुलला लागली. तिथे दोन-तीन दिवस मुक्काम झाला. तब्येतीमुळे कुठे हिंडणे फिरणे झाले नाही. आबीला पत्र पाठवले होते. पण गाठ पडली नाही. हेनझाबा बोटीवर हिंदुस्थानची तिकिटे रिझर्व केली होती. बोट लगेच निघणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीसह गोपाळराव हेनझाबा बोटीवर चढले. बोट प्रशस्त होती. आनंदीबाई चे तिकीट फर्स्टक्लास होते. केबिन दुसऱ्या मजल्यावर छान हवेशीर होती. हिंदुस्थानात पोहोचेपर्यंत काळजी नव्हती. दोन तासांनी बोट सुटणार होती. आनंदी केबिनमध्ये कॉटवर पडली होती. शेजारी गोपाळराव उभे होते. दुसऱ्या कॉटवर कोण्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्याचे सामान पडले होते. थोड्या वेळात सहा फूट उंचीचा गोरापान लालबुंद लष्करी अधिकारी केबिनमध्ये आला. त्याचे लक्ष काॅटवरील विकलांग, दारिद्री स्त्रीवर पडली मात्र, त्यांनी आरडा ओरडा करून सगळ्यांना जमा केले. मग पर्सल, कॅप्टन आले, एखादे घाणेरडा गलिच्छ जनावराकडे पहावे तसे हे तीन गोरे अधिकारी या काळ्या जोडपाकडे बघत होते. कॅप्टन पुढे होऊन त्यांची तिकीट तपासली. म्हणाला, कोणा गाढवाने या बोटीची तिकिटे तुम्हाला दिली? आनंदी उठून बसली. सर्वांग कापत होते. लज्जा, राग, अपमान अनेक संमिश्र भावना मनात उमटल्या होत्या. कॅप्टन म्हणाला, तुम्हाला उतरावं लागेल. ही बोट काळ्या लोकांसाठी नाही. गोपाळरावांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पैसे भरले. बायको अतिशय आजारी आहे. बोटीतून चढ उतार करणे व लंडनच्या थंडीत राहणे शक्य नाही. असे विनवले. पण ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत कोणीच नव्हते. कॅप्टनने नोकरांकरवी सामान धक्क्यावर फेकून दिले. शर्मिंदे देऊन दोघांनाही बोटीवर उतरणे भाग पडले. हा आघात जबरदस्त होता. सुतकात बसावी तशी दोघेही एकमेकांकडे बघत बसली होती. दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी खटपट करून पी. अँड. ओ. कंपनीच्या पेशावर बोटीत जागा मिळवली. याही बोटीत हेनझाबा बोटीसारखाच प्रकार होता. गोऱ्या उद्दाम नोकरांच्या कृपेवर जगणे भाग होते. पोर्ट सैद बंदरा पासून ताप चढला. खोकला सुरू झाला. अंगात मुळीच त्रास नव्हते. त्यामुळे तिला गोपाळरावांची सारखी मदत लागे. ते फर्स्ट क्लास मध्ये येऊन बसले की, नोकर कुरकुर करत. त्यांना जाण्यास सांगत. आंघोळीला पाणी देत नसत. जेवणात शाकाहारी पदार्थ नसत. पाव लोणीने ओकारी येई. एखाद्या वेळी भूक लागली, दूध मागितले तर शिल्लक नाही असे सांगितले जाई. पैसे देऊन सुद्धा उपासमार सहन करावी लागे. बोटीवरच्या डॉक्टरचे नाव केर हार्डी होते. त्याला काळ्या लोकांबद्दल अतिशय तिरस्कार वाटे. त्याची वैद्यकीय शास्त्राची पदवी तिसर्या दर्जाची होती. त्याला कशी तरी या कंपनीत नोकरी मिळाली होती. एके दिवशी आनंदीच्या छातीत इतका कफ दाटला की, श्वास घेणे दुष्कर झाले. अंग तापाने फणफणले होते. गोपाळराव फार घाबरले. नाईलाजाने डॉक्टरला बोलवायला गेले. डॉक्टर त्यावेळी केबिनमध्ये एका स्त्रीबरोबर मद्य प्राशन करीत होता. गोपाळरावांचे विद्रूप ध्यान पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अशा आनंदी क्षणी काळ्या स्त्रीला बघायला जाणे त्याच्या जीवावर आले. पण कपाळाला आठ्या घालून आनंदीच्या केबिनमध्ये आला. तपासल्यासारखे केले. म्हणाला हा मलेरिया आहे. क्वीनच्या गोळ्या घ्या. आनंदी म्हणाली, हा मलेरिया नाही. डॉक्टर म्हणाला, कोणासमोर बोलती आहेस? मीही डॉक्टर आहे. इंडियन? गोपाळराव म्हणाले, ती अमेरिकन विश्व विद्यालयाची एम.डी. आहे इंग्लंड मधल्या कोणत्याही कॉलेजपेक्षा श्रेष्ठ आहे. केर हार्डी ताडकन उभा राहिला. म्हणाला, मी या बोटीचा मेडिकल ऑफिसर आहे. मला तुम्ही शिकवू नका. काळ्या लोकांनी मध्ये मध्ये बोललेलं मला चालणार नाही. क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.

!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - ४३. त्या बोटीच्या मेडिकल ऑफिसरने क्वीनाईनचा डोज पाठवून दिला. आनंदीने नाही घेतला. तिला खोकल्याची मोठी उबळ आली. म्हणाली, यांचे असे वागणे सहन होत नाही. ती रात्र वाईट गेली. आनंदीने औषधच सोडून दिले. प्रकृती जास्त बिघडेल असे वाटले. पण तसेच झाले नाही. तिला भारतीय जेवणाची भूक लागली होती. बोटीवरचे पाव लोणी घशाखाली उतरत नव्हते. पत्र लिहिण्याची ताकत अंगात नव्हती. तरीही तिने सासूबाईंना पत्र लिहिले. आपल्या देशात येऊन कधी एकदा चांगले जेवण जेवेनसे झालेय! एक पत्र लिहून थोडे दमल्यासारखे झाले. तरी तिने दुसरे पत्र लिहायला घेतले.. मावशीला सुरुवात केली... लांबलचक पत्र लिहिण्याची मला ताकद नाही. खोकला पाठ सोडत नाही. ब्राॅंकायटीसपासून फार त्रास होत आहे. सारखी बोट लागत असल्यामुळे खाणे पिणे व्यायाम वगैरे काहीच होत नाही. अंथरुणावरच पडून आहे. तुम्हाला सोडल्यापासून एक क्षणही तुमच्या सर्वांच्या आठवणी शिवाय गेला नाही. इतके लिहून ती फार दमली. गोपाळरावांना म्हणाली, आता पुढचं तुम्ही लिहा... गोपाळरावांनी आनंदीच्या तब्येतीबद्दल खरखरी माहिती कळवली. गोऱ्या लोकांनी बोटीवर पैसे देऊनही जो त्रास दिला त्याचे वर्णन केले. पुढे लिहिले.. मी सर्वसाधारण गोऱ्या लोकांबद्दल लिहिले. अपवाद असतातच. तुम्ही आहात. आणखी आहेत. या बोटीवर आमचा अतिशय छळ झाला. काळे नेटिव्ह म्हणून पदोपदी हिनवण्यात आले. खाणे पिण्याचेही हाल केले. ही सर्व हकीगत बोटीवरच्या एका गोऱ्या माणसाला कळली. त्यांनी निरोप पाठवला पैशाची अडचण असेल तर माझ्याकडून घेऊन जा. जमेल तेव्हा परत करा. असा परोपकारी माणूस परत भेटणार नाही. त्याच्या उदात्तपणाने भारावून गेलो. दिवस जात होते. उद्या मुंबई बंदराला बोट लागणार होती. आज रात्री दोघे जागे होते. सकाळी नऊ वाजता बोट धक्क्याला लागणार. गोपाळरावांनी पहाटेच स्नान केले. आनंदीनेही हट्टाने केली. म्हणाली, आज छान नटणार. कितीतरी दिवसांनी स्वदेश दर्शन होणार. तिने काळी चंद्रकळा नेसली. नाकात नथ, कानात कुडी, गळ्यात मोहनमाळ घातले. चांगले ठळक कुंकू रेखाटले. तिच्या सौंदर्याने गोपाळराव मुग्ध झाले. अंगावर काश्मिरी शाल पांघरलेली ती साक्षात सरस्वती सारखी दिसत होती. दोघेही डेकवर येऊन बसले. क्षणाक्षणांनी मुंबई जवळ येत होती. बोट बंदराला लागली. आनंदीने भक्ती भवाने नमस्कार केला. तिला अश्रू आवरत नव्हते. गोपाळराव स्तब्ध होते. खाली उतरून बंदरावर आली तेव्हा पण दहा-पंधरा नातेवाईक स्वागताला आले होते. तपश्चर्या पूर्ण झाली. नातेवाईकांनी गाडीतून त्यांना गोपाळरावांच्या मावसभावाकडे पोहोचवले. तिथे भेटायला येणाऱ्यांची गर्दी उसळली. वर्तमानपत्रांनी खास अग्रलेख लिहून आनंदीचे अभिनंदन केले. गोपाळरावांच्या मावसभावाच्या चाळीत दोन खोल्या होत्या. जमीनीला ओल होती. घरात माणसं खूप होते. सगळ्या तऱ्हेच्या संकोच होता. तिथून हलने भाग होते. शेठ माधवदास रघुनाथदास कापडियांनी फारच आग्रह केल्यामुळे काही दिवस त्यांच्या बंगल्यात राहणे झाले. शेठजींच्या उपकाराचे ओझे वाटू लागले. शिवाय आनंदीच्या प्रकृती उतार पडेना. नुसता हाडांचा सापळा उरला होता. बोलण्याचेही श्रम होत होते. माधवदासांकडून आनंदीने हट्ट करून आग्र्यांच्या वाडीत खरेंकडे गेले. गोपाळरावांना अशी हलवाहलवी पसंत नव्हती. पण तिच्या हट्टापुढे काही चालत नव्हते. खऱ्यांकडेही नातेवाईकांची गर्दी जमा झाली. आजी, आई, बहिणी, भाऊ, सासू, दीर सगळे सुश्रुषा करण्यासाठी आली. जवळचे पैसे संपले होते. प्रवासात कर्ज झाले होते. आवक कुठूनच नव्हती. कोल्हापूर दरबाराची रुजू होण्याबद्दलची आज्ञापत्रे सारखी येत होती. रुजू झाल्याशिवाय पगार सुरू होणार नव्हता. तोपर्यंत खडखडाटच होता. आलेल्यांना पोसणे जिक्रीचे झाले होते. प्रकृती बिघडतच चालली होती. प्रथम वाटले, श्रमाचा ताप असेल. परदेशात झालेल्या हेंडसाळीमुळे शरीर थकले असेल. पण तसे नव्हते. ताप, खोकला, अशक्तपणा वाढतच होता. मुंबईच्या डॉक्टरांनी आनंदीला क्षय झाल्याचे निदान केले. त्यांच्या मते रोगमुक्त होणे कठीण आहे. देशी वैद्य म्हणाले हा क्षय नाही. हा एक प्रकारच्या खोकला आहे. तो नक्की बरा होईल. गोपाळरावांची अवस्था अडकित्तात सापडल्यासारखी झाली होती. एका रात्री फारच तगमग झाली. उलटी झाली. आतून शरीर सोलवटून निघाले. छातीत भयंकर कळा येत होत्या. क्षणाचा भरोसा नाही अशी अवस्था झाली. तिच्याजवळ धाकटा दीर, सासूबाई, गोपाळराव बसले होते. क्षीण आवाजात आनंदी म्हणाली, आपण पुण्याला जाऊन महेंदळेंचे औषध घेऊ. घेऊन चलाल? गोपाळराव म्हणाले, मी व्यवस्था करतो. उद्या निघू. सासूने कपाळाला हात मारला. अमेरिकेतून एवढी मोठी वैद्यकीय पदवी मिळवून आलेली आपली सून वैद्याच्या औषधासाठी जीव टाकत आहे. चमत्कारिकच आहे. गोपाळरावांनी सहजी जाऊ म्हटल्यावर आईने त्यांच्याकडे आश्चर्याने बघितले. मुलाच्या विक्षिप्त स्वभावाचे तडाखे जन्मभर आईने सोसले होते. मुलाने आक्रस्ताळी स्वभाव सोडला. सुतासारखा सरळ झाला हे महद् आश्चर्यच होते. अमेरिकेतून आल्यापासून गोपाळराव पूर्ण बदलल्याचे तिच्या लक्षात आले. आई काही बोलणार हे लक्षात येताच, गोपाळराव शांतपणे म्हणाले, आई, तुम्ही दोघे सकाळच्या गाडीने पुण्याला पुढे जा. राव बहादुर भिड्यांना त्यांच्याकडे व्यवस्था करायला सांगा. आम्ही परवा सकाळी निघू. ठरल्याप्रमाणे गोपाळराव व आनंदी तिसऱ्या दिवशी पुण्याला निघाले. भिडेंकडे उत्तम व्यवस्था होती. घर मोठे होते. पैशाची सुबत्ता होती. सरकार दरबारी वजन होते. एक-दोन दिवस गेले. खोकला फारच जोरात होता. सारखी तहान लागत होती. धड झोपवतही नव्हते, ना बसवत होते. जिवाची तगमग चालली होती. तिच्या मनाने बापूसाहेब मेहेंदळेंचा ध्यास घेतला होता. दोन दिवसांनी गोपाळराव बाळशास्त्री माटे वैद्याकडे गेले. सर्व हकीगत कथन केली कसेही करून महेंदळेंना आणण्याविषयी माटेंना गळ घातली. क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.

!!! डाॅ. आनंदीबाई जोशी !!! भाग - ४१. एके दिवशी कोल्हापूर दरबारातून छत्रपतींचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते, हिंदुस्थानात लवकर परत या. आणि कोल्हापूरच्या दवाखान्याचा चार्ज घ्या. कोल्हापूर नोकरीत येणार असलात तर येण्याचा खर्च देण्यात येईल. या पत्राने पुन्हा खळबळ उडाली. काय करावे ठरेना. कोल्हापूरची जागा चांगली होती. अधिकाराची होती. शिवाय संगमनेरहून सासूबाईंना आणता आले असते. तिकडे त्यांचे फार हाल चालले होते. पण इकडचे शिक्षण थांबले असते. कोणीतरी म्हटले, हवा पालटाने बरे वाटेल. शिवाय रमाबाईंना व गोपाळरावांना नायगारा धबधबा पाहायचा होता. मिसूरी संस्थानात गेल्याने गुण येईलसे वाटत होते. पण मावशीला मान्य नव्हते. आनंदीच्या अशा अवस्थेत इतक्या लांबचा प्रवास झेपणार नाही असे त्यांना वाटत होते. पण आनंदीच्या हट्टापुढे त्यांचा नाईलाज झाला. धबधबा पाहून न्युयार्कला आल्यावर तब्येत आणखीच बिघडली. खोकलाही वाढला. दिवसभर अंथरुणावरच पडून राही. गोपाळांचा ठाव सुटला. फिलाडेल्फियाला स्त्रियांच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये आठ-दहा दिवस ठेवण्यात आले. सर्व प्रकारच्या परीक्षा झाल्या. पण गुण येईना. प्रतिदिन शरीर खचत चालले होते. बॉडलेबाई रोज भेटून जात होत्या. त्या दिवशी मोठे डॉक्टर तपासून गेले. बाॅडले बाई गंभीर झाल्या. त्यांनी गोपाळरावांना बाजूच्या खोलीत बोलावून म्हटले, इथली हवा आनंदीला मानवत नाही. इथे ती दुरुस्त होऊ शकणार नाही. डॉक्टर बाॅडले बाईंनी मोठ्या प्रयासाने चेहऱ्यावरचे भाव लपवले. म्हणाल्या, इथे तिला बरं वाटणार नाही हे नक्की. मग कुठे वाटेल? कोणत्याही रोगाला स्वदेशी हवा चांगली. तुम्ही लवकरात लवकर हिंदुस्थानात परत जा. तिथे तरी बरे वाटेल का? त्या गंभीरपणे म्हणाल्या, मी लपवून ठेवत नाही. तुम्ही तिला सांगू नका. एकच गोष्ट चांगली आहे की, रोग फुफ्फुसापर्यंत पोहोचला नाही. गोपाळराव लहान मुलांसारखे रडायला लागले. डॉक्टर बाॅडलेंनी त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, परमेश्वरावर विश्वास ठेवा. कधीकधी मायदेशाच्या हवेने मोठे रोग बरे होतात. स्वतःला सावरून गोपाळराव बाहेर आले. आनंदी जवळ जाऊन म्हणाले, आज मी कोल्हापूर दरबारला पत्र टाकले. आनंदी म्हणाली, पण माझी तब्येती अशी.. ते म्हणाले, अगं! हे गोरे डॉक्टर मूर्खच! आपण पुण्यात जाऊ. बापूसाहेब मेहेंदळेंचे औषध घेऊ. ते नक्की तुला बरे करतील. मग लवकर चला. कधी एकदा मेंहेंदेळेंचे औषध घेते व दुरस्त होते असे झाले. गोपाळरावांना रडू आवरे ना. उठून ते व्हरांड्यात गेले. उपरण्याने डोळे पुसत राहिले. सर्व मंडळी रोसेलहून न्यूयॉर्कला पोहोचली. तिथूनच इंग्लंडला जाण्याची बोट होती. मावशी फार बेचैन होती. तिला आनंदीकडे बघवत नव्हते. ही मुलगी बरी होणार नाही असे त्यांचे मन सांगत होते. न्यूयॉर्क पर्यंतचा दोन चार तासाच्या प्रवासानेच आनंदी विलक्षण थकली. खोकल्याची ऊबळ सुरु झाली. अंथरुणावर पडून राहावेसे वाटू लागले. डोळे जळजळत होते. हाता पायात कळा येत होत्या. पण आनंदीने कुणालाच सांगितले नाही. बंदरावर जाण्याची वेळ झाली. तिचा उजवा डोळा सारखा लवत होता. ती गोपाळरावांना म्हणाली, लक्षण ठीक दिसत नाही. उजवा डोळा सारखा लवतो. आणि स्फुंदून स्फुंदुन रडू लागली. ते करड्या आवाजात म्हणाले, डोळा लवते तर लवू द्या. काही होणार नाही. रडण्याचा तमाशा नको. तिने स्वतःला आवरले. कपडे केले. गाड्या आल्या होत्या. मावशींच्या गळी पडून रडली. मैत्रिणींनी मोठा पुष्पगुच्छ दिला. मावशी रडल्या. पण आनंदीने निग्रहाने डोळ्यात पाणी येऊ दिले नाही. निर्जीव पुतळ्याप्रमाणे निश्चल उभी राहिली. खूप रडायचे होते.... पण .... गाड्या बंदरावर पोहोचल्या. सामान खाली उतरवले. एवढ्यात पमिला जवळ असलेली पिशवी कशी कोणास ठाऊक खाली पडली. पिशवीतले कॉड लिव्हरची ऑइलच्या बाटल्या फुटल्या. ऑइलने पिशवीतील सगळे सामान भिजून गेले. आणि आबीने दिलेली तसबेरीला तडा गेला. तसबीरीवर ऑइल ओघळले. आबीने दिलेले चित्र खराब झाले. आनंदी म्हणाली, अपूर्ण चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं पण ते असं नष्ट व्हायचं होतं. माझं नशीबही तसच आहे. मावशीने तिच्या पाठीवरून हात फिरवून सांत्वन केले. तिला धायमकडून रडायवेसे वाटत होते. पण गोपाळरावांच्या धाकामुळे शक्य नव्हते .चित्राची अवस्था पाहून आनंदीच्या मनात काळा कुट्ट अंधार दाटला. बोटीवर चढण्याची घंटा झाली. आनंदीने मावशीला व मिस्टर कार्पेटरांना हिंदू पद्धतीने खाली वाकून नमस्कार केला. मुलींना मिठीत घेतले. काही न बोलता मान खाली घालून बोटीत चढली. गोपाळरावही चढले. बोट सुरू झाली. ज्ञान संपन्न होऊन देशाचे भले करण्यासाठी परत जायचे होते. यश मिळवले होते. पण दृष्टावले होते. आनंदीचे फर्स्ट क्लासचे तिकीट होते. गोपाळराव सेवक म्हणून खालच्या वर्गात होते. ते मधून मधून येऊन जात. सगळ्या वेळा तिला एकटीनेच काढावी लागे. रोगाशी लढणे फार कठीण होऊ लागले. दोन-तीन दिवस असेच गेले. आता पायातून कळा येत होत्या. छातीत कफ दाटला होता. गोपाळराव सारखे तिच्या शेजारी बसून होते. चौथ्या दिवशी समुद्र एकदम खळवळला. तुफान सुरू झाले. लाटांनी बोटीची पार दशा करून टाकली होती. बोट क्षणात बर्फावर चढे. क्षणात दरीत कोसळे. आनंदीचा ताप वाढला होता. केबिनमध्ये अंधार पसरला. आनंदीचे भान गेले. कुणीतरी राक्षस आपल्याला दरीत लोटतोय असे स्वप्न पडू लागले. आनंदीचा धीर सुटला. ती ओक्सीबोक्सी रडायला लागली. गोपाळरावांच्या पायाला मिठी मारून म्हणाली, माझा अंतकाळ जवळ आलाय. मी आता चाललेय. मावशीला नमस्कार कळवा. गोपारावांनी तिला थोपटत म्हणाले, वेडी आहेस का? निघाल्यापासून रडली नाही. आता मोठ्याने रडतेस. असं काय करावं बरं? क्रमशः संकलन व लेखन, मिनाक्षी देशमुख.

*जिंदगी में सफलता कभी भी पक्की नहीं होती,* *और असफलता कभी भी अंतिम नहीं होती..!* *इसलिए आप अपनी कोशिश तब तक जारी रखों* *जब तक आपकी जीत एक इतिहास न बन जाये..।।*🌹🥳

कथा 🌵स्पर्श तुझा काटेरी 🌵 भाग ५९ सीमा ची मुलगीही आता तीन वर्षाची झाली होती. राजसाची मुले पाच वर्षाची झाली होती. पण शावी राजवीरला अजूनही मुलं नव्हते.त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. राजवीरची आई आता शावीशी तुटक तुटकं वागायला लागली होती. सारखं टोमणे मारत होती.स्वतःला मुल नको आणि भावाचं बर खेळवावं वाटतं. शावीला खुप दु:ख होत असे.पण ती काही बोलत नसे.तिला वाटे त्यांना सगळं माहित असूनही अस का बोलतात.एके दिवशी शावीच्या घरी तिची मावस सासू आली.ती तिच्या सासूचे कान भरू लागली. " अग शारदा तुझ्या नवऱ्याने आणि मुलाने एवढी संपती कमवून ठेवली आहे. पण काय कामाची .त्याला वारसचं नाही तर.मला वाटतयं दानच करावी लागेल बघं. त्यापेक्षा अस कर ना,माझा धाकटा मुलगा दमन याच्या नावावर कर.नाहीतरी या हडळीने माझ्या दुष्यंतला खाल्लचं आहे.त्याचा मोबदला समज.हाताशी कमवता आलेला मुलगा घेतला हिने.तेही नसेल पटतं तर राजवीरचे दुसरे लग्न कर.का होत नाही ग.हिला मुलं काय निघाला रिपोर्ट्स मधे." " काय निघणार, अवघड आहे म्हणतात मुल होण.अगोदरच कांदा नासल्यावर त्याला पात कशी येणार.लग्ना अगोदरच कांड करून ठेवले होते बयेने.राजवीरचं मुलं नसत ना तर त्याच्या थाऱ्याला उभ केलं नसतं. " " काय सांगतेस,लग्ना अगोदरच गरोदर होती ही.मग मुलं पाडलं कि काय हिने.म्हणूनच देव आता मुल देत नाही. बाई ग,कसला जमाना आलाय ग.राजवीर पण एवढा उतावळा कशाला झाला होता ग." चहा घेऊन येणारी शावी बाहेरच थांबून सगळं ऐकत होती. ते ऐकून ती थरथरू लागली.तिच्या हातातून ट्रे निसटला आणि खाली पडला.कप खळकन फुटले.काय आवाज आला म्हणून सासू व मावशी बाहेर आल्या तर शावी रडत होती आणि धक्का लागल्या सारखी बघत होती.दोघीही घाबरल्या पण तसे न दाखवता ," काय झालं शावी बाळ." शावीला हलवून तिच्या सासू बाई विचारू लागल्या. पण शावीने त्यांना झिडकारलं आणि पळतच आपल्या खोलीत निघून गेली. शावीची सासू व मावशी हादरून गेल्या. त्यांना कळालं कि शावीने सगळं ऐकलं आणि ती राजवीरला सांगणार.त्या घाबरून तिच्या मागे मागे गेल्या. त्या बाहेरून ओरडू लागल्या शावी दरवाजा उघडं आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं.राजवीरचे बाबापण गडबडीने वर आले.पण आतून काही आवाज येत नव्हता. ते घाबरले."हरी,नामदेव,गणेश जरा वर या पटकन. " सगळे नोकर वर गेले.त्यांना बाबांनी दरवाजा तोडायला लावला. दरवाजा तुटला आणि पाहतात तर काय.शावीने पंख्याला गळफास घेतला होता आणि सारंगी पलंगा जवळ थांबून रडत होती. बाबा ,राजवीरची आई ,मावशी सगळे एकदमचं ओरडले.तेवढ्यात मागून आशाने ( त्यांची कामवाली) पाहिले.तिने लगेच राजवीरला फोन लावला. " साहेब शावी मैडम ने पंख्याला गळफास घेतला. " तसेच तिने राजसालाही कळवले .राजवीर तर मिटींगरूममधे मिटींगमधे होता.तो खूप जोरात ओरडला."काय्य,काय बोलतेस तू."तो धावतच पळतच निघाला. कोणाला काय झालं आहे हे कोणालाही कळाले नाही. इकडे राजसाने तिच्या सासरी सगळ्यांना सांगितल. सगळे ते ऐकून हबकलेच.आई मात्र शांत होती.राजसा तर रडायलाच लागली.तिचे बघून सीमापण रडायला लागली. तिने जय,विजय व बाबांना कळवले. ते ही घाबरून निघाले. इकडे राजवीरचे बाबा पळतचं आत गेले.ते पटकन पंलगावर चढले आणि शावीचे पाय धरून वर केले.जेणे करून गळ्यावर ताण येऊ नये.नोकरांना पटकन तिला खाली उतरावयाला सांगितले.लगेच गाडीत घालून सिटी हॉस्पीटल ला घेऊन निघाले.आशाला सगळ्यांना तिकडेच यायला सांग असे सांगितले. राजवीरची आई व मावशी दुसऱ्या गाडीतून मागे मागे निघाल्या.पण काय होईल शावीचं ती वाचेल कि राजवीरने दुसरं लग्न करावं म्हणून या जगातून निघून जाईल. क्रमशः सौ हेमा येणेगुरे पुणे

आज 5 जून आहे. जागतिक पर्यावरण दिन . त्यासाठी खास 🍀दडलय गुपीत पानापानात🍀 तुळशीचे पान - विष्णूपदी स्थान.. बेलाचे पान - शंकरचा मान.. केवड्याचे पान - नागाचे स्थान.. रुईचे पान - मारुतीची शान.. केळीचे पान - भोजनाशी छान .. नागवेलीचे पान - गोविंदविड्याला छान.. मेंदीचे पान - शकुनाचा मान.. पळसवडाचे पान- द्रोणपत्रावळी छान.. पिंपळाचे पान - मुंजाचे स्थान.. गुलाबाचे पान - काटेरी छान.. कढीपत्त्याचे पान - फोडणीत स्थान.. आळूचे पान - अळूवडीला छान.. तमालपत्राचे पान - मसाल्याची शान.. वहीचे पान - लिहायला छान.. पुस्तकाचे पान - माहितीची खाण.. गवताचे पान - दवबिंदू शोभायमान.. ओव्याचे पान - सुवासिक छान..त्याला भजीत - मान.. तुळशीचे पान - स्मरणिशक्तीला महान.. कोरफडीच पान - त्वचेला छान... आपट्याचे पान-त्याला सुवर्णांचा मान.. आंब्याचे पान - तोरणाची शान..त्याला शुभ कार्यांत - मान 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 🌿🌿पाना पानांचा राखा मान 🌿🌿 🌲🌲झाडे लावा झाडे जगवा !!🌲🌲 🌳 जय विज्ञान! जय वसुंधरा!!