
Yuti's Hub Library
February 21, 2025 at 06:23 AM
आंघोळ झाली तशी बाळाचे डोळे मिटायला लागले..दुपट्यामधे बांधून गुंडाळी करेपर्यंत बाळ गाढ झोपी गेलं.. बाळाच्या आईचे पण नुकताच massage आणि उन उन पाण्याने आंघोळ झाल्याने डोळे मिटू लागले आणी ती बाळाच्या शेजारीच आडवी झाली.. बाळाची आजी दोघांना बघुन समाधानाने हसली.. वास्तविक बघता आजीचेही डोळे मिटत होते कारण बाळाने काल रात्री सुद्धा चांगलेच जागवले होते.. पण मग लेकिला भुक लागेल ना उठल्यावर.. आजीने मरगळ झटकली आणी ती स्वयंपाकघरात आली
स्वयंपाक घरात बाळाच्या आजीची 80 वर्षे वयाची आई भाजी निवडत बसली होती.. आई होती 80 वर्षाची पण एकदम खट म्हातारी.. अजुन सगळी स्वतः ची कामं स्वतःच करायची आणी दूसरयाची पण..
" अगं आई, काय करतेस हे, जरा आराम करावा की नाही कधी न्हवं ते आलीस तर?" बाळाच्या आजीने आईला विचारलं " अगं असुदे गं, जन्म गेला काही ना काही काम करण्यात..आता कंटाळा येतो नुसतं बसायचा.." आई उत्तरली " हे बघ , मी मेथी चिरुन ठेवल्ये आणी खीर करुन ठेवल्ये रव्याची.. मेथीत लसुण घालू नको गं आणी..बाळंतिण आहे ना ती" बाळाच्या आजीला हसू आले..
https://www.shrutimundada.com/2025/02/21-february-international-mother.html
बाळ,बाळंतिणीच जेवणं झाली तशी बाळाच्या आजीच्या डोळ्यात अजुन झोप दाटून आली पण धाकटी लेक कॉलेज मधून येउन जेवायची होती.. बाळाच्या आजीची आई म्हणाली " सुमे, पड जरा इथेच थोड्या वेळ.. छोटी आली तर मी आणी ती बघतो.." " अगं पण आई " " झोप म्हणते ना" आईने दम भरला..
बाळाची आजी उठली तेव्हा सगळे धाकटी ने केलेला चहा पित होते.." अरे देवा, इतका वेळ झोपले की काय मी" आजीने विचार केला.. तीने चटक्याने बाळंतिणीच्या खोलीत डोकावुन पहिलं तर बाळाची आई आणी बाळ मजेत खेळत होते..
बाळाची आजी चहा घेउन आई जवळ बसली.. " खुप वेळ झोपले गं आई मी" समोरचा सुरकुतलेला चेहरा खुप समाधानी होता.. "असुदे गं सुमे किती दमायला होतं मला माहित आहे, मी गेली आहे ना ह्या सगळ्यातून.. दुर्देवाने तेव्हा माझी आई न्हवती पण तेव्हाच ठरवलं होतं जर मी जगले वाचले तर तुझ्या लेकीच्या बाळंतपणाला नक्की जाणार.. हे बघ आज ऊन ऊन खिचडीच कर मुगाची आणी कढी.. ताक घुसळून ठेवलंय मी"
बाळाची आजी त्या सुरकुतल्या चेहरयाकडे पहातच राहिली..
वय कितीही असो आणी लेकिच वय कितीही वाढो, आई ती आईच असते नाही का..❤❤
*सायली साठे ™️©️*
❤️
👍
🙏
👏
💐
🥹
🫶
45