
Yuti's Hub Library
February 21, 2025 at 11:59 AM
कथा
बाॅइज रिटन टोंगा (एक साहसी आणि अद्भभुत कथा )
भाग २१
फेरासला काय करावे कळतं नव्हते.तेवढ्यात ऐगेते परत म्हणाला." फेरास वाचव मला,मला मरायचे नाही. मी उगीच इकडे आलो.आपण खालीच बरे होतो.आता मी घरीही जाणार नाही आणि खाली मित्रा कडेही जाणार नाही. उगीच वर आलो.मी मेलो तर तु एकटा काय करणार आहेस इथे.तु कोठे जाशील.खाली जाशील का एकटा ,कि वर जाशील.बघं मला वाचवं."
https://www.shrutimundada.com/2025/02/21-february-international-mother.html
ऐगेतेचे ऐकून फेरास भानावर आला.खरचं एकटे आपण काय करू? त्याने इकडे तिकडे पाहिले.त्याला एक मोठी वेल दिसली.त्याने ती दगडाने तोडण्याचा प्रयत्न केला पण तुटली नाही.हाताने ओढली पण तुटली नाही. त्याला रडू येत होतं.ओढून ओढून हात लाल झाले होते. कसेतरी करून त्याने ती वेल तोडली.ती वेल त्याने ऐगेते कडे फेकली.ऐगेतेने ती वेल पकडली.फेरास त्याला वर ओढू लागला.ऐगेतेने कपारीचा हात सोडला नव्हता.तो त्याला पकडत पकडत वर येत होता. फेरास हे करत असताना त्याला आपल्या शेजारी दोन भयानक आकृती थांबलेल्या दिसल्या. तो घाबरून गेला, त्याने वळून पाहिले तर दोन भयानक आकाराची माकडे शेजारी थांबले होते. तेही खाली वाकून पाहत होते.फेरासने घाबरून हात सोडून दिला. ऐगेतेला झटका बसला.त्याचा तोल गेला,तो
खाली घसरू लागला.फेरास भांबावून पाहू लागला.तेवढ्यात एक माकड उडी मारून खाली गेले आणि ती वेल पकडून वर आले.आता दोघे माकडे मिळून ऐगेतेला वर ओढू लागले.ते पाहून ऐगेते व फेरासची भिती पळून गेली. आता फेरास ही त्यांना मदत करू लागला. ऐगेते कपारीला पकडत वर आला. वरच्या बाजूला तर त्या दोन माकडांनी वर ओढून घेतले.ऐगेतेने पटकन त्या माकडाच्या हाताची पप्पी घेतली.त्या दोघांनी त्याला आर्शिवाद दिला आणि निघून गेले.ऐगेतेने आपल्या हातापायाकडे पाहिले.त्याला बरचं खरचटलं होतं. पायाला लागल्या मुळे चालताही येत नव्हते. त्यांनी तेथेच एक सुरक्षीत जागा बघून बसून घेतलं. आज तरी त्यांना वर चढता येणार नव्हतं. कारण ऐगेतेचा पाय दुखावला गेला होता. ऐगेतेला तेथे बसवून फेरास फळे आणायला जाऊ लागला. तेवढ्यात ते माकडे परत आली.एकाच्या हातात फळे तर दुसऱ्याच्या हातात शहाळी होती.त्यांनी ते त्या दोघांना खायला दिले. फेरास आणि ऐगेतेला आश्चर्य वाटू लागले. ना हे आपल्याला घाबरत आहेत ,ना आपल्याला घाबरवत आहेत.उलट किती मदत करत आहेत.दिवसभर त्या दोघांची ते दोन माकडे काळजी घेत होते.पण अंधार पडल्यावर मात्र ते तेथून निघून गेले.हे दोघे मात्र एका मोठ्या दगडाला टेकून बसले.आतून ते खूप घाबरले होते.तसेच अंगावरील कपड्याचा खुप घाण वास येत होता. ते एकमेकाचा हात पकडून बसून गेले. रात्री परत मुसळधार पाऊस आला.पण आता यांना कोठेही निवारा नव्हता.एखादे मोठे झाडही नव्हते.रात्रभर पावसात भिजत तेथेच बसले.अंगात हुडहुडी भरली पण पावसाच्या पाण्या मुळे अंगावरील कपड्याचा घाण वास कमी होत होता. खुप वेळ पाऊस पडून थांबला.ते तसेच बसून राहिले. पण दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठले तेंव्हा दोघांनाही खुप ताप आला होता. ते दोघेही शुध्दीत नव्हते.आता या दोघांना कोण सांभाळणार होतं. यांची काळजी कोण घेणार होतं.
क्रमशः
सौ हेमा येणेगुरे पुणे
👍
1