Yuti's Hub Library
Yuti's Hub Library
February 22, 2025 at 07:18 AM
कथा बाॅइज रिटन टोंगा (एक साहसी आणि अद्भभुत कथा ) भाग २३ ऐगेते आणि फेरासला खाली यायचं होतं पण खाली उतरण अवघडं होतं. https://www.shrutimundada.com/2022/02/sushmita-sen-first-indian-miss-universe.html इकडे खाली मुलांनी आपलं जगण चालू ठेवलं होतं. ते दोघे परत येतील का नाही हे माहित नव्हते.त्याची आशाही ठेवली नव्हती पण कधीतरी जहाज येईल आणि आपण आपल्या घरी जाऊ ही आशा मात्र ठेवली होती.मुलांनी शेतात आता गाजरें लावली होती.त्यांना भरपुर गाजरे खायला मिळणार होती.पण एके दिवशी शेतात गेले तर पाहतात काही गाजरे उखडून वर पडली होती. काही माकडे खात होती तर काही माकडं उपसून टाकत होती तर काही मधेच जमिनित गायब होत होती.मुलांना काय चाललय कळतं नव्हतं. वरून शेताची नासधुस बघून वाईट वाटतं होतं. आज त्यांनी माकडांना आवाज करून हुसकावून लावलं नाहीतर त्यांनी दगड फेक केली.सगळी माकडं काही दुरवर पळाली पण परत येऊ लागली.वेगासने काथ्याची गोफ केली आणि दगड मारू लागला.त्याने लुई,नेमाए व ऐनीला पण गोफ बणवून दिली.आता माकडांनवर दगडांचा मारा जोरात होऊ लागला तेंव्हा ते पळून गेले.पण जमिनीच्या आत गाजर ओढणे चालूच होते. वेगासने पळत जाऊन गाजराला पकडले व वर ओढले.गाजरा सोबत त्याला धरलेला ससा बाहेर आला. वेगासला पाहताच घाबरला आणि गाजर सोडून बिळात गायब झाला. शेवटी लुई व वेगासने ठरवले ,सगळे गाजरं काढून घेऊन जायचे.छोटे तसेच ठेवायचे.त्यांनी सगळी गाजरे काढली आणि टोपलीत भरून घरी नेलं. पण एवढ्या गाजराच काय करायचं हा प्रश्न पडला? ऐनी म्हणाली, मम्मी असताना ती गाजर किसून मधात शिजवून पुडींग बणवून द्यायची.आपण पण असच करू.बाकी शिजवून खाऊ.बघू किती दिवस हे टिकतात ते. इकडे वर ऐगेते व फेरास खाली कसे यायचे विचार करत होते.ते माकडांना सांगत होते पण त्यांना काय कळावे.शेवटी ते परत खाली उतरून जायला लागले.तेंव्हा माकडांना कळाले कि हे खाली उतरून जात आहेत. मग त्यांनी त्यांना आपल्या मार्गाने खाली नेऊ लागले.मधे मधे ते घसरत,त्यांच्या पायाला खरचटतं असे.अर्धा रस्ता पार झाला पण माकडे खाली यायला तयार होतं नव्हते.जिथे ते भिजून पडले होते त्याच्या खाली पर्यंत यांना आणून सोडलं होतं. कदाचित इथ पर्यंतच त्यांची हद होती.चढाई तर कशीबशी केली होती पण उतरणे अवघडं होते.एकदा जरी तोल गेला तर थेट खाली दरीतचं.वरून अंगावर कपडे नव्हते.अंगावरील पाने दगडात वा काट्यात अडकून फाटत होते.शरीराला थंडी झोबंत होती.कित्येक दिवस अंघोळ न केल्याने अंगाचा वास येत होता. वाढलेले केस व दाढी मुळे ते खरोखरीचे आदीमानव वाटतं होते.आता जर त्यांचे मित्र त्यांच्या समोर असते तर ते त्यांना ओळखलेच नसते.खरचं जेंव्हा हे खाली जातील तेंव्हा ते यांना ओळखतील का? पण हे नक्की खाली जातील ना? कि वेगळचं काही घडेल. क्रमशः सौ हेमा येणेगुरे पुणे
👍 😢 2

Comments