Swayamsiddha Foundation
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 24, 2025 at 05:34 PM
                               
                            
                        
                            विसरून सारे व्याप ताप
थांबून थोडे जगूया
एक दिवस केवळ माझा म्हणून
मिळून सारे साजरा करूया
नमस्कार मैत्रिणींनो 
एक दिवस माझा या थीमवर आपण ८ मार्चला (शनिवार) जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत.
 येणाऱ्या जागतिक महिला दिनी आपण सर्वजण संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली येथे जमा होऊन एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवणार आहोत. तिथेच असणाऱ्या कान्हेरी केव्हस, गांधी स्मारक इत्यादी ठिकाणांना पण आपण भेट देणार आहोत. 
पूर्ण दिवस आपण एकमेकांसोबत राहून आपलं टीम स्पिरिट वाढवणार आहोत जे व्यवसायासाठी नेहमीच आवश्यक असतं. शिवाय आपण आपल्या ओळखी वाढवू, आपल्या बिझनेसची माहिती इतर मैत्रिणींना देवू, या शिवाय अनेक खेळ व  अन्य भरघोस कार्यक्रम ही असणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहालच अशी आम्ही अपेक्षा करतो. 
दिवसभराच्या कार्यक्रमाचे शुल्क : 
₹ 300/- मात्र (एंट्री तिकिटे, बस भाडे, चहापान, जेवण इत्यादी).
नाव नोंदणीसाठी आपले नाव WhatsApp करा : 
कल्पना 8108921295
मेघना 9029051434
मानसी  9833364930
आयोजन
स्वयंसिद्धा फाऊंडेशन