मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 6, 2025 at 03:39 PM
क्विक कॉमर्स आणि मराठी माणूस
सकाळी हार्डवेअर च्या दुकानात गेलो दुकानाचं नाव “सुदर्शन हार्डवेअर”असल्यानं मराठी माणसाच आहे म्हणून आत गेलो
दादा एक ५ च ड्रिल द्या
- तिकड काउंटर ला जा
काउंटर वर मालक फोन वर बोलत होता ३-४ मिनिट वाट पाहिली आणि त्याला म्हटलं “दादा एक ५ च ड्रिल द्या लाकडात मारायच” फ़ोन दुसऱ्या खांद्यावर घेतला आणि कानाने दाबत एका हाताने ड्रॉवर उघडल आणि नेमक काय शोधायच हे विसरला आणि अजून ५ मिनिट ड्रॉवर चिडवत राहिला
मी परत पोरया कडे गेलो आणि त्याला म्हटलं ड्रिल आहे का ?
- तिकड काउंटर वर जा तिकडून घ्या
जवळ पास १० मिनिट गेल्याने मनातल्या मनात म्हटल तुमची aye घाला आणि मारवाड्याच्या दुकानातून ड्रिल घेतलं
पण याचा आणि क्विक कॉमर्स चा काय संबध ?
पण आधी हे समजून घ्या क्विक कॉमर्स म्हणजे काय
आपल्याला लागणारी कोणतीही वस्तू १० मिनिटात घरी आणून देणार ज्यात भाज्या, फळे, साबण शॅम्पू , धान्य इलेक्ट्रिक वस्तू काही कपडे कोलगेट किराणा सगळच तुम्ही फक्त ऑर्डर करायचं १० मिनिटात घरी
परत तुम्ही म्हणाल अस कुठ अस्तय त्याना कस परवडणार घरी आणून द्यायला
तर साध्या शब्दात सांगतो आता सेम हेच आकडे असतील अस नाही पण असेच असतात
३० रुपयांचा आपण हो साबण घेतो तो फैक्टरी विकते १८ रुपयांना मग येतात जिल्हा तालुका गाव पातळीवरचे डिस्ट्रब्युटर ज्यांच त्यात मार्जिन येत मग शेवटी दुकानदाराला तो मिळतो २६ ला आणि आपल्याला मिळतो ३० ला
अर्थात डी मार्ट आणि इतर मार्ट ला थेट मिळत असल्याने २० रुपयांपर्यंत मिळतो म्हणून तिथ स्वस्त मिळतात वस्तू
पण क्विक कॉमर्स म्हणजे
Blink IT, Instamart, Zepto
सारख्या कंपन्या ना माल विकत घेतात ना पैसे देतात उलट त्यांच्याकडे फैक्टरी जाऊन पाय धरतात की आमचे प्रोडक्ट ठेवा आणि सगळ्यात स्वस्त माल याना मिळतो
मग आता राहतो प्रश डिलिव्हरी चा ज्या साठी या क्विक कॉमर्स कंपन्या खच्चून कमिशन घेतात आणि माल पोचवतात
आणि यात कोणताच एजंट नसल्याने आपल्याला पण व्यवस्थित किमती मध्ये माल मिळतो
पण तुम्ही म्हणाल तेवढेच ना मग काय मी जातो ब्लिंक इट वर
तेवढे सोप नाहीये ये ५० गोष्टी तपासतात ते त्याना पाहिजे क्वालिटी ब्रांड आणि विश्वास कारण माल घेणारा व्यक्ती खुश होऊन परत आला पाहिजे
( एकदा ब्लिंक इट वरून फळ मागवून बघा तुम्हाला अंदाज येईल क्वालिटी चा )
आता येऊ महत्वाच्या मुद्द्यावर
आम्हाला काय फरक पडणार ? माझ दुकान तर मेन चौकात आहे
तर
३ पिढ्या गल्ल्यावर बसून तुम्ही जो थाट केला तो जाणार
तुमच्या दुकानात जाऊन विचाराल की दादा ५ वाली शॅम्पू पुडी आहे का ? तर फक्त मान मागे वळवून तुम्ही नाही म्हणायचे आणि आम्ही दुसऱ्या दुकानात जायचो
तुमच्या दारात गाडी पार्क केली तर हवा सोडायचे
आणि हीच समस्या क्विक कॉमर्स सोडवत आहे आता फक्त ४-५% हे सुरू झालं आहे
भविष्यात तुम्ही कोणत्याही खेड्यातून जरी घर बसल्या मोबाईल वर ऑर्डर दिली तर स्पीनच पासून ते चेरी टोमेटो पर्यंत सगळं १० मिनिटात घरी येणार ते ही २४ तास कधी पण
आता अगदीच खोलात जाऊन हे सगळं कस चालत हे नाही सांगत बसत पण ड्रोन डिलीव्हरी आणि अजून काही टेस्टिंग सुरू आहेत ज्याने वस्तूंच्या किमतीत खूप फरक पडणार
तर सगळं सांगायचं कारण एवढाच की मराठी माणसान व्यवसायाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण दुकान टाकल आणि इथ माझ एकट्याच दुकान आहे तुम्हांला यायलाच लागेल हा दृष्टिकोन बदलला पाहिजे
राहिला प्रश्न हॉटेल आणि खाणावळींचा तर एक दुःखद बातमी तुमच्यासाठी पण आहे की zepto Cafe, blink it यांचे कैफ़े आणि फ़ूड आइटम आलेले आहेत खूप स्वस्त आणि खूप भारी क्वालिटी मध्ये तर तिथ पण फरक पडेल तूर्तास
क्वालिटी आणि ऑनलाइन कडे लक्ष द्या कारण आपल्याला फक्त मराठी माणूस म्हणून जगण्यापेक्षा मराठी व्यावसायिक आणि मराठी व्यापारी म्हणून मोठ व्हायच आहे नोकरी बाहेर पण मोठ जग आहे त्यात पण टिकायच आहे
मनोज शिंगुस्ते
👍
👌
🙏
7