मराठी अपडेट्स - Marathi Updates WhatsApp Channel

मराठी अपडेट्स - Marathi Updates

1.8K subscribers

About मराठी अपडेट्स - Marathi Updates

*इथल्या पोस्ट फॉरवर्ड केल्याने पुण्य मिलते.* विश्वास नाही बसत? फॉरवर्ड करून तर बघा... 😎 ● व्ह्यायरल कंटेंट ● जोक्स विनोद ● मिम्स ● उपयुक्त माहिती ● लाईफ हॅक्स ● जुगाड ● विज्ञान, माहिती तंत्रज्ञान ● आरोग्य *सर्वकाही इथेच मिळेल* *मराठी अपडेट्स,* मराठी माणसासाठी.... इथपर्यंत आला आहात तर पटकन सबस्क्राईब करा ... *फायद्यात रहाल* 😅 ⭐ आमचे सर्व अपडेट्सचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी चॅनलला *जॉईन केल्यावर अनम्यूट करावे*... Contact us : https://t.me/+IZrKhyJWbi4yYzE1

Similar Channels

Swipe to see more

Posts

मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 6:14:20 AM
Post image
😂 😮 8
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 6:03:58 AM

https://www.bbc.com/marathi/articles/ckgnnwp4yndo

Post image
❤️ 👍 3
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 11:40:07 AM

जयंतराव नारळीकर आपल्यातून निघून गेले ही बातमी सकाळी ऐकली आणि खूप बेचैन झालो. याचं कारण विज्ञानातला खरं म्हणजे एक ध्रुवताराच निखळला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थानं विज्ञानावर संशोधन करणाऱ्यांपैकी आणि भारतात परत येऊन भारतामध्ये वैज्ञानिक संशोधन आणि विवेकवादी तसंच विज्ञानवादी दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याला आपल्या सगळ्यांचा सलाम ! नारळीकर हे फक्त वैज्ञानिक नव्हते तर ते विज्ञान लेखक आणि साहित्यिकही होते. दुर्गा भागवतांनी त्यांच्या विज्ञानकथांचं खूप कौतुकही केलं होतं. त्यांचं यक्षाची देणगी हे पुस्तक वाचून मी खूप भारावून गेलो होतो. त्यानंतर त्यांची टाईम ट्रॅव्हल, अवकाशातले स्फोट अशा अनेक विषयांवरची पुस्तकं वाचली. मग त्यांच्या कादंबऱ्या झाल्या. त्यांनी मराठी साहित्यात एवढी भर घातली की 2021 सालचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पण खरं त्यांचं योगदान हे विश्वविज्ञान किंवा कॉस्मोलॉजी याविषयीचं होतं. नारळीकर केंब्रिजला गेले, तिथे रँगलर झाले, फ्रेड हॉईल या तिथल्या प्रसिद्ध वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केलं आणि त्यांच्याचबरोबर हॉईल- नारळीकर थेअरी मांडली. गेल्या शतकात विश्वनिर्मितीच्या विषयी दोन महत्त्वाचे विचार किंवा थेअरीज निर्माण झाल्या. एक म्हणजे बिग बँग आणि दुसरी म्हणजे स्टेडी स्टेट. बिग बँगच्या थेअरीप्रमाणे विश्व एका बिंदूपासून स्फोट होऊन निर्माण झालं आणि ते प्रसरण पावत राहिलं. पण त्याविरुद्ध हॉईल आणि नारळीकर स्टेडी स्टेटची थेअरी मांडत होते. काही दशकं हा वाद खूपच रंगला. पण शेवटी 1970 च्या दशकात बॅकग्राऊंड मायक्रोवेव्ह नॉईज अमेरिकेतल्या न्यू जर्सी मध्ये सापडला आणि त्यामुळे बिग बँगची थेअरी सिद्ध झाली असं कित्येक वैज्ञानिक मानायला लागले. प्रत्यक्षात नारळीकरांची थेअरी किती बरोबर आणि किती चूक यापेक्षा त्यांच्या संशोधनाचा स्तर हा आंतरराष्ट्रीय कॉस्मोलॉजी मध्ये किती मोठा होता हे आपल्या लक्षात येईल. आणि एवढ्या मोठ्या माणसानं मराठीवर प्रेम म्हणून मराठीमध्ये अनेक पुस्तकं लिहिली. त्यांचं 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं आहे. इतक्या सोप्या मराठी भाषेत कॉस्मोलॉजी सामान्यांना कळेल अशा भाषेत सांगणं म्हणजे काही चेष्टा नव्हती. मी किमयागार लिहिताना नारळीकरांमुळे खूपच प्रेरित झालो होतो. 1972 साली इंदिरा गांधींच्या आग्रहामुळे नारळीकर भारतात परत आले आणि त्यांनी या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी खूप मोठी कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. प्रथम टी आय एफ आर आणि नंतर आयुका अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट तर्हेनं अध्ययन आणि संशोधन या दोन्ही बाबतीत प्रचंड काम केलं. अर्थातच त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण अशा अनेक सन्मानांनी भूषवलं यात काही नवल नव्हतं. त्यांचा साधेपणा मला नेहमी भावायचा. आयआयटीनंतर एक वर्षभर मुंबईमध्ये मी जी भटकंती केली त्यात टी आय एफ आर मध्ये सुद्धा अनेकदा मी जायचो. त्यावेळेला नारळीकर तिथे अनेकदा दिसायचे. मुंबईला आकाशवाणीच्या ऑडिटोरियममध्ये त्यांचं एकदा भाषण होतं. अतिशय शांतपणे बोलणं आणि अवघड संकल्पना सोप्या करून सांगणं हे मला आयुष्यभर खूपच महत्त्वाचं वाटलं आहे. कॉस्मोलॉजी आणि गणित यात तर त्यांची मास्टरी होतीच पण त्याशिवाय त्यांना अनेक विषयात रस असायचा. एकदा त्यांचा मला असाच फोन आला. ते म्हणाले "अच्युत, तुझं अर्थात हे पुस्तक आत्ताच वाचून संपवलं. अर्थशास्त्रावरती मराठीमध्ये इतकं सोपं आणि सुंदर पुस्तक मी अजून वाचलेलं नाही." आणि यानंतर ते बराच वेळ बोलत राहिले. माझा ऊर तर भरून आलाच, पण मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटत राहीलं. एवढा मोठा वैज्ञानिक अर्थशास्त्रसारख्या विषयात रस घेतो, मन लावून ते पुस्तक वाचतो आणि नंतर लेखकाला त्याची दाद आणि पावतीही देतो हे मी कधीही विसरणार नाही. ज्योतिषाविषयी त्यांची मतं खूप परखड होती. (खरं म्हणजे विवेकानंदांची सुद्धा तेवढीच परखड मतं होती हे कित्येकांना माहीत नसेल. यासाठी दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक वाचावं). यामुळे नारळीकरांना श्रद्धांजली जर का द्यायची असेल तर आपण यापुढे अंधश्रद्धेला बळी पडणार नाही आणि वैज्ञानिक आणि विवेकवादी दृष्टिकोन अंगीकारू अशी आपण शपथ घेतली तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. अच्युत गोडबोले

❤️ 🙏 👍 9
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 6:58:07 AM

'म्हातारी तर केव्हाची मेली, सोकावलेला काळ समोर उभा ठाकलाय' ~ गौरव सोमवंशी २०२४ मध्ये शॉन के नावाचा मेटाव्हर्स अभियंता वर्षाला १.२८ कोटी रुपये कमावत होता. आज तो न्यूयॉर्कच्या एका ट्रेलरमध्ये राहतो आणि फूड डिलिव्हरी करून आपली उपजीविका करतो. त्याने ८०० पेक्षा जास्त नोकरी अर्ज पाठवूनही, आठ-दहाच कंपन्यांनी मुलाखती घेतल्या - त्याही बहुतेक AI सॉफ्टवेअरमार्फत. त्याचा इशारा स्पष्ट आहे: ही सुरुवात आहे, आणि जगभरात अशी परिस्थिती वाढतच जाणार आहे. जगभरात अर्थव्यवस्था आणि राजकारण गोंधळलेलं आहे. युद्ध, महागाई, बेरोजगारी आणि समाजिक तणाव यांचं चक्र थांबत नाहीये. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, या परिणामांचा अनुभव ग्रामीण व निमशहरी भागात अधिक तीव्रतेने जाणवतो. मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणी आर्थिक वाढ दिसते, पण मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश यांचं काय? इथे अजूनही दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि नोकरीसंधींचा अभाव आहे आणि तो दिवसांदिवस वाईट होत आहे. सोने पे सुहागा म्हणजे हे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक स्वतंत्र संकट बनलं आहे. केवळ आर्थिक मंदी नाही, तर AI मुळे अगदी पांढरपेशा नोकऱ्याही धोक्यात आहेत. ICRIER च्या अहवालानुसार, भारतात पुढील तीन वर्षांत ग्राहक सेवा, किरकोळ विक्री आणि प्रशासन क्षेत्रातील २२ टक्के नोकऱ्या AI मुळे संपण्याचा धोका आहे. अगोदरच ते असे पण कमी होत आहेत पण ज्या देशात सोशलिस्ट पोलिसी नीट राबविल्या जात नाहीत तिथे AI म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. या दुहेरी संकटासमोर उपाय एकच - सोशलिस्ट, लोकाभिमुख धोरणांची मागणी. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देणारे मोफत, दर्जेदार शिक्षण, सर्वसमावेशक आरोग्यसेवा, घर, रोजगार आणि माणुसकीची सन्मानजनक वागणूक ही मूलभूत गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं: राजकीय सत्ता हीच सामाजिक प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. ही उद्दिष्टं प्राप्त करायची असतील, तर केवळ विनंती करून नाही चालणार - राजकीय दबाव, संघटित मताधिकार आणि धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहे. पण राजकीय दबाव येणार तरी कुठून? या परिस्थितीत जाती, धर्म, या चौकटी पार करून सामूहिक सहकार्य आणि एकमेकांचा आधार अत्यंत गरजेचा आहे. पिळवणूक आणि हतबलता ही केवळ एका समाजापुरता मर्यादित नाही - शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, असंघटित क्षेत्रातील महिला, छोट्या व्यापाऱ्यांना सर्वांना तो जाणवतोय. म्हणूनच सर्वच शोषित गटांनी एकत्र येऊन स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, सामूहिक खरेदी-विक्री केंद्रं, आणि जिल्हा पातळीवरील नागरिक मंच यांसारख्या माध्यमातून आपापसांत सहकार्य सुरू केलं पाहिजे. अशा आधारातून केवळ तात्पुरती मदतच नव्हे, तर सामूहिक आवाज आणि धोरणांवर परिणाम करणारी ताकदही तयार होते. पण आपण यशाची संकल्पना थोडीशी चुकीची समजून घेतली आहे. काही IAS अधिकारी, न्यायाधीश किंवा उद्योजक तयार झाले, काही लोक फॉरेनला जाऊन शिकले, म्हणून आपण प्रगतीपथावर आहोत, असं होत नाही. ही प्रतिनिधित्वाची पातळी आहे - पण बदलाची नाही. बाबासाहेबांनीच म्हटलं होतं: काही व्यक्ती प्रगती करू शकतात, पण समाज तिथेच राहतो. खरी सामाजिक उन्नती ही संघटित, राजकीय-सामाजिक चळवळीनेच शक्य आहे. सांस्कृतिक पातळीवरही आपण मार्ग चुकत चाललोय. महापुरुषांची जयंती, पौर्णिमा या उत्सवांचा उपयोग होतोय, पण ते बऱ्याचदा सामाजिक आणि राजकीय विचारांपासून तुटलेले वाटतात. आपण अवघड दशकात प्रवेश करत आहोत, असा चित्रविचित्र काळ समोर येत आहे जिथे विरोधाभास एका नंतर एक तयार होत राहतील, जसं आपण सुरुवातीला शॉन के या इंजिनिअरवरून पाहिलं. उपाय आहे - दृष्टिकोनात स्पष्टता, आकडेवारीवर आधारलेली मागणी, आणि सुसंघटित दबाव. ~ गौरव सोमवंशी Gaurav Somwanshi

❤️ 👍 💯 😢 4
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 5:13:42 AM
Post image
🙏 😢 8
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 9:20:52 AM

लग्नाच्या वाढदिवसाचा अनुषंग. आई म्हणाली,'बाळा, नवरीच्या अंगावं गुंजभर तरी सोनं लागातंच.!' म्हणून, ६४६८/- मंगळसुत्र (वर्मा ज्वेलर्स हडपसर, हप्त्यावर) येथून घेतलं. १० महिन्यात त्याचे पैसे फेडून टाकले. ३५० /- लग्नाचा शर्ट, मुलचंद येथून घेतला. ४५०/- प्यांट, मुलचंद. ७००/- आईला साडी, मुलचंद येथून. १३००/- वर्हाड टेम्पो गावडे मामांनी ठरवला. ६७५/- किरकोळ खर्च. ■ लग्नात घालतात असं सांगितलं म्हणून नरेंद्र झिंजाड (पुतण्या) ह्याच्याकडून कोट आणला. लग्नानंतर त्याला तो परत दिला. ० /- वरात खर्च (केलीच नाही त्यामुळे "फुग्यांचा (दारू) खर्चही वाचला) (त्यामुळे नवीन बेवडे तयार करण्याचे पातक आमच्या माथी लागले नाही, शिवाय त्या रात्री अख्खे गावही लाखोल्या न वाहता शांतपणे झोपी गेले) ०/- टोपी टॉवेलचा खर्च. कामाला जाताना जे कपडे घालायचो तेच कपडे हळदीसाठीही वापरले. तरी कुणाला काहीच समजले नाही. कुणाकडून आहेर घेतला नाही... कुणाला साडी नेसवली नाही. फेटा बांधला नाही. जागरण, गोंधळ अजूनही घातला नाही. लग्नासाठी फक्त ५ दिवस सुट्टी काढली. त्यात एक दिवस जाणे एक दिवस येणे धरून. दुसऱ्याची गाडी घेऊन नवरी दाखवायची म्हणून उगाच गावोगावी फिरलो नाही. ■ लग्न आहे म्हणून आईनी घर चांगलं शेणानी सारवून घेतलं होतं. चुलीला सुंदर पोतेरा दिला होता. उभ्या भिंतीही पांढऱ्या मातीनं आईनं सारवल्या अन जिथं आईचा हात पोहोचत नव्हता तिथं मी स्वतः हातात 'पोतेरा' घेऊन सारवल्या. फुटक्या खेटरी कौलांच्या जागी पत्र्याच्या डब्याची झाकणं कापून मी स्वतः बसवली. पावसात घर कमी गळावं म्हणून तो आमचा नेहमीचा उपाय होता. लग्नाच्या आदल्या दिवशी मावशा मुक्कामी आल्या होत्या. त्यांना मी म्हणालो, "तुम्हा तिघींनाबी मला पॉर झाल्यावं लुगडी घेईल, आता मातर मपल्याकं पैसे नाहीत". त्यांनी आईच्या काळजाने समजून घेतलं. त्यांच्या कम्बरेच्या पिशवीतून १००-१०० रुपये मला दिले. त्यांचीही तेवढीच श्रीमंती होती पण त्याच २०० रुपयात आईनं हळकुंडं आणि साखर आणली. ढांगाढोंगात लगीन केलं नाही तरी पोरं झाली. थोडी उशिरा का होईना झाली पण झालीच. देवाला प्रभा मिळाली. प्रभू+देवाचा संसार फुलला. पोरांचेही वाढदिवस आले अन गेले. केक मात्र कधीच कापला नाही. कापणारही नाही. घरच्या घरी औक्षण करणं व जिथं गरज आहे तिथे थेट मदत करणं हे माझं तत्व. मदत करत राहणार. बायकोनं माझ्यासारख्या पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरणाऱ्या माणसाला संभाळून घेतलं. मीठ मिरची खाऊनही प्रसंगी दिवस काढले. कधी कुठला हट्ट केला नाही. उंची कपडे, महागड्या मेकअपच्या कधीच ती नादी लागली नाही. बायको अन नवरा समविचारी असली की संसार कडेला जातो म्हणतात ते खरं आहे. सोबत आहोत.असू. प्रभा तुला लग्नाच्या एवढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! वाचनाचा वेग वाढत रहावा. फार लेक्चर काय कामाचे. सुरुवात स्वतःपासून करावी. थेट कृती करा. लग्न साधी करा, जास्त खर्च केला म्हणजे लोकं लई चांगलं म्हणत्यात असं काही नसतं. किंवा गावातली लोकं आपल्याला फार श्रीमंत समजतात असं नव्हे. शेवटी लोकं, आपलीच बंदी खाऊन आपल्याच बोकांडी बसायला तयार असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जगलं की माणूस सुखी होतो. राहतो. मोठा होतो. आम्ही आमच्या कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असं झालं असतं, नाही का? १९९९ ला पुण्यात आलोय तेव्हापासून बँक सोडली तर कुणापुढे कधीच हात पसरले नाहीत. बँक सोडून आजही माझ्यावर कुणाचं कर्ज नाही. आई म्हणायची, 'रीन काढून सण करणारे जिनगानीत कधीच म्होरं जात नाहयीत.' तेच तत्व आयुष्यभर पाळलं त्यामुळे पुण्यात प्ल्यास्टिकची बंदतुटकी पिशवी घेऊन आलेलो मी आज पुण्यात पोट भरू शकतोय... एवढंच सांगेन की, गरिबी आली तर अजिबात लाजू नका. श्रीमंती आली तर माजू नका.... जेवढे साधे रहाल तेवढे मोठे व्हाल हा मंत्र कुठल्याही चंगळवादी काळात आपल्याला जगवेल. - देवा झिंजाड देवटीप - आता अनेक कमेंट करणारी माणसं असं म्हणतील की जीवन एकदाच असतं, खर्च करायला काय हरकत आहे? माझं त्याबद्दल अजिबात दुमत नाही. ज्यांच्या खिशात पुरेसा पैसा आहे त्यांनी तो जरूर खर्च करावा पण आमच्याकडे पैसा नव्हताच. आमचं घर आमच्या लग्नाच्या वेळेसही पावसाळ्यात गळतच होतं. त्यामुळे आम्ही काटकसर करून लग्न साधेपणाने केलं. जर सुदैवाने आमच्याकडे त्यावेळेस पैसा जरी असता तरीही आम्ही आमचं लग्न अतिशय साधेपणानेच केलं असतं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते ते करावे. काहीजण असे म्हणतील की लग्नात सासू-सासर्‍यांनी तुम्हाला चांगले कपडे घेतले नाहीत का? तर त्यांची खूप चांगली कपडे घ्यायची इच्छा होती परंतु लग्नात होणारे अनेक प्रकारचे अनावश्यक खर्च वाचवून ते पैसे आम्ही आमच्या संसारासाठी राखून ठेवले. त्याचा पुढे फायदा झाला. - देवा झिंजाड

Post image
❤️ 👍 5
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 2:53:44 PM
Post image
😂 🤣 11
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 1:26:13 PM

जयंत नारळीकर हे इतके साधे व्यक्ती होते की मी नुकताच पोस्ट ग्रॅज्युएशन करून मुंबईला टी आय एफ आर मध्ये डब्ल्यू एच ओ च्या प्रोजेक्टमध्ये कामाला लागले होते. आमच्याकडे ऑफिसर्स मेस म्हणजे वेस्ट कॅन्टीन आणि बाकी समस्त लोकांसाठी ईस्ट कॅन्टीन किंवा भारतीय खाद्यपदार्थ मिळणार साधं कॅन्टीन अशी दोन पर्याय होते. वेस्ट कॅन्टीन हे फक्त उच्च अधिकाऱ्यांनाच वापरता येत असे तसेच उच्च अधिकारी आपल्या गेस्ट तिकडे घेऊन जाऊ शकत होते पण ईस्ट कॅन्टीनमध्ये कोणीही जाऊ शकत होती. आम्ही पहिल्यापासून वेस्टर्न तोंडाचे असल्यामुळे नेहमीच वेस्ट कॅन्टीनला जाऊन वेस्टर्न पदार्थ खात असू. तिथे मग कितीही मोठा अधिकारी मोठा वैज्ञानिक किंवा कोणी येऊ प्रत्येक जण एका विशिष्ट रांगेमध्ये उभे राहून बुफेचे जेवण घेत असत. आणि मग रांगेच्या शेवटी एक काउंटर होता तिथे प्लेट मधले पदार्थ बघून जेवणाचं बिल केलं जात असे. जे तेव्हा सर्वसाधारण जास्तीत जास्त नॉनव्हेज जरी खाणारे असतील तरी त्यांचं बिल आठ ते नऊ रुपये होत असे. किंवा अगदी क्वचित प्रसंगी 12 रुपये. एकदा मी दुपारी लंच साठी म्हणजे लंच दुपारीच असतं पण मी लंच साठी कॅन्टीनला गेले होते आणि एक कोपरा बघून माझी डिश घेऊन जेवायला बसले. मी जेवत होते इतक्यात कोणीतरी मला म्हणाले की मी तुमच्या शेजारी असलेल्या या खुर्चीत बसू शकतो का? मी सहज वर पाहिलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तसा आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे टी आय फार मध्ये स्टीफन हॉकिंग सारखे लोक सुद्धा येऊन गेले होते आणि आम्ही त्यांना अटेंड केलं होतं. पण तरीही जयंत नारळीकर सारखा माणूस आपल्याला चेअर साठी विनंती करतो या धक्क्यात न सावरायला मला काही सेकंद लागले. आणि मी माझ्या नकळत जेवताना उठून उभे राहिले आणि त्यांना खुर्ची सरकवून दिली म्हणजे ते मॅनर्स असतात , की हो म्हणायचं. मला थोडक्यात हे सांगायचं आहे की अतिशय साधा निगर्वी आणि कसलाच अहंकार नसलेला अत्यंत हुशार असा हा माणूस मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता. आणि काही मिनिटं त्यांच्यासोबत जेवले होते आणि मग छोटीशी आमची गप्पांची मैफली झाली होती. एखादा प्रथम सायंटिस्ट हा हसमुख चेहऱ्याचा असू शकतो हे जयंत नारळीकर यांच्याकडे पाहिल्यानंतरच विश्वास ठेवू शकले होते. मी आजपर्यंत कितीतरी लोक मेले अनेक लोकांनी फेसबुक वर त्यांच्या अनेक गोष्टी लिहिल्या पण मी कधीच कोणाला किंवा कोणाबद्दल लिहिलं नव्हतं पण आज मला थांबताच आलं नाही. -- गौरी https://www.facebook.com/share/p/1AW7JCCiXd/

Post image
❤️ 🙏 👌 7
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/20/2025, 5:47:14 AM
Post image
😂 🙏 11
Image
मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
5/19/2025, 5:01:56 PM

*पाकिस्तानी माल 😝😅*

😂 😀 😮 13
Image
Link copied to clipboard!