मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 10, 2025 at 07:41 AM
ही यादी आहे मेडिक्लेमवाल्या कंपन्यांची. यातला पहिला कॉलम आहे तो आहे क्लेम 'डीसअलाऊ' केल्याचा म्हणजे, क्लेममधले मान्य नसलेले भाग. म्हणजे दहा गोष्टींचं जर बिल लावलेलं असेल तर नऊ किंवा कमी गोष्टी मान्य करणं. दुसरा कॉलम आहे तो आहे 'रेप्यूडाएटेड' म्हणजे क्लेम १००% अमान्य करणं. हेल्थ इन्शुरन्स घेताना निव्वळ अमाऊंट आणि प्रीमियम इतकंच बघू नका. आयआरडीए कितीपैकी किती हा आकडा देत नसल्याने, पर्सेंटेज क्लेम इतर सोर्सेस कडून बघावे लागतात. अलीकडे, वैद्यकीय खर्चासाठी, लोकं विमा न काढता पैसे म्युच्युअल फंडात टाकण्याचाही मार्ग धरत आहेत. काहीजण कॅशलेस असूनही हॉस्पिटलला सांगत नाहीत, नंतर क्लेम मिळवतात.
👍 😮 3

Comments