मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 13, 2025 at 01:47 PM
निवृत्त प्राचार्य रामकुमार सिंह हे सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आहेत.अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले सिंह आता सेंद्रिय शेती करीत आहेत. काल मंझोलमध्ये पुष्पराज व अली हुसेन यांच्यासोबत त्यांच्या शेतीला भेट दिली. ते मला सेंद्रीय शेती कशी करतात,हे सांगू लागले तेव्हा मी त्यांना थांबवलं.मी म्हटलं, ते सगळं मला माहिती आहे.मला चर्चा करायचीय.मी विचारलं,शेडनेट मधील सिमला मिरचीचा अनुभव कसा आहे? त्यांनी इथं काय काय केलं ते सांगीतलं.जैविक फवारणी, खुडणी वगैरे. दोन महिन्यांचं ते पीक माझ्या दृष्टीने फारसं चांगलं नव्हतं.मी विचारलं, ही मिरची शंभर टक्के सेंद्रिय आहे का? ते बोलले,मिरचीचं पिक शंभर टक्के सेंद्रीय येऊच शकत नाही. ही मिरची ८०टक्के सेंद्रिय आहे...मी हसून विषय बदलला. प्राचार्य सिंह मला मिलेटचं (भरडधान्य) महत्त्व सांगू लागले.मी म्हटलं, मिलेटचं आरोग्यासाठीचं महत्त्व मला मान्यच आहे.तुम्ही उत्पादित केलेलं मिलेट कुठं विकता? यावर ते बोलले,याच्यासाठी बाजारपेठ किंवा विशिष्ट ठिकाण नाही, लोकांना याचं महत्त्व पटलेलं नाही. ते विकत घेत नाहीत. विकणं अवघड झालयं.यावर प्रक्रिया करायला हवी... मी म्हटलं, मग तुम्ही कशासाठी हे पिकवता...तुम्ही प्रक्रिया का करीत नाही.यावर ते बोलले,सरकार यासंदर्भात काही करायला तयार नाही. प्रक्रिया करून बनवलेला माल विकेल याची खात्री नाही...मी भरपूर मश्रूम तयार केलयं.पण विक्रीअभावी ते तसेच पडून आहे.... मी पुन्हा विचारलं,विकण्याची,जादा पैसे मिळण्याची खात्री नसताना तुम्ही सेंद्रीय शेतीचा पुरस्कार कशासाठी करताय? यावर ते रासायनिक शेतीमुळे होणारे रोग,माती निकृष्ट होणे...वगैरे बोलू लागले.शेवटी ते शेती फायद्यासाठी नाही, आनंदासाठी आहे..असं म्हणू लागले.मी म्हटलं, हे बरोबर आहे.तुम्ही तुमच्या आनंदासाठी हे जरूर करा.तुमचं पोट शेतीवर अवलंबून नाही...पण याचा प्रचार करू नका.हे काम सरकार करतयं...तुम्ही फक्त आनंद घ्या.. मला कळलं की,त्यांच्या मुलाला यात रस नाही. तो शेतीत यायला तयार नाही. ते मात्र पूर्णवेळ निष्ठेने शेती करतात. नवी पिढी शेतीत यायला तयार नाही,त्यामुळं शेतीचं भवितव्य कठीण आहे, हे त्यांनी स्वत:च सांगीतलं.त्यांच्या शेतालगतचा गहू बघून फोटोसाठी मी तिकडे गेलो.तिथं असलेल्या तरूणाला मी विचारलं, हा गहू सेंद्रिय आहे का? तो आधी मस्त हसला.तो बोलला,सेंद्रीय बोलायची गोष्ट आहे.रासायनिक खताचा डोस,फवारणी केलीय म्हणून हा गहू चांगला आहे.बाजुच्या शेताकडं बोट दाखवत तो म्हणाला, तिथं एकाचा सेंद्रीय गहू आहे... जाऊन बघा,लगेच फरक कळेल. खरं तर,माझ्यासाठी हे काही नवं नव्हतं.पुष्पराजने प्राचार्य सिंह यांच्याबद्दल खूप काही सांगीतलं होतं,म्हणून मी उत्सुकतेने त्यांना भेटायला गेलो.दहा मिनीटातचं माझ्या सगळं लक्षात आलं.ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नाही तर,भावनिक बोलत होते. पुष्पराज सायंकाळी पाटण्याला जाणार असल्याने, मी सिंह यांच्याकडं मुक्कामी थांबायचं असं आधी ठरलं होतं...पण ही भेट झाल्यावर मी पुष्पराजला म्हटलं,तुझ्या घरीच मी थांबतो...चर्चा नको..विश्रांती महत्त्वाची..आणि निघालो. बिहारमध्येही सेंद्रीय शेती हे मृगजळ आहे,हे लक्षात आलं.खात्रीची,रासायनिक धान्यापेक्षा अधिक भाव देणारी बाजारपेठ उपलब्ध झाल्याशिवाय सेंद्रीयकडं शेतकरी वळणार नाहीत... मुळात सरकारला, कृषी विभागाला याबाबतीत काहीच करायचं नाही... त्यांनाही हा मुद्दा भावनिक बनवायचाय..विषमुक्त शेती..वगैरे बोलत राहायचं,जाहिरातबाजी करायची,समारंभ करायचे आणि शेतकऱ्यांना पुढे करून सगळा निधी खायचा... सबसिडीच्या नावाखाली महागड्या, निकृष्ट वस्तू शेतकऱ्यांच्या गळ्यात मारायच्या. महाराष्ट्र असो की बिहार...कृषी खातं हे भ्रष्टाचाराचं आगार आहे.ते.शेतकऱ्यांना लुटण्यासाठीचं निर्माण झालंय. सिंह ना मी शेवटी निघताना विचारलं,शेतकरी सरकारच्या धोरणांवर खूष आहेत का? ते बोलले,अजिबात नाही.. शेतकऱ्यांमध्ये राग आहे. मी म्हटलं,असं असताना शेतकरी मतदार शेती विरोधी राजकारणी पुन्हा पुन्हा कसं निवडून देतात? याचं उत्तर त्यांना देता आलं नाही... त्यांनाच नाही, तर इतर कोणालाही याचं नेमकं उत्तर देता येणार नाही... https://www.facebook.com/share/1FR151tSLD/
😮 👌 3

Comments