मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 25, 2025 at 12:16 AM
किराणा यादी ते स्वालंबन! लहान मुलांना विशेष करून , मोठे होणाऱ्या मुलांना कसे वाढवावे याबद्दल बाल मानसशास्त्राचे पुस्तक वाचत होते. त्यात लिहिलेले होते, 🧒🏻👧🏻मुलांना तारुण्यात आल्यावर अचानक जबाबदारी दिल्यावर ती एक तर ती जबाबदारी पेलली जात नाही, किंवा त्यांचं स्वतःचा असा विकास होत नाही म्हणजे त्यांना तो दृष्टीकोनच निर्माण होत नाही. उदाहरणार्थ,🤔 बँकेत जाऊन स्लिप कशी भरावी? 🤔कोणता आणि कसा भाजीपाला आणावा? रेल्वेचे तिकीट कसे बुक करावे? कमीत कमी स्वतःचं स्वतः करता येईल इतका स्वालंबन तरी आवश्यक असेल तर त्यांना लहानपणापासून छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देणं गरजेचं आहे, मला हे वाचल्यावर ही गोष्ट पटली. त्यापुढे त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की स्वालंबन किंवा जबाबदारी प्रेरणा किंवा घरातल्या गोष्टींमध्ये मुलांना समाविष्ट करून घेणे हे वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासूनच सुरू व्हायला हवं.. तर मग शेवटी मी एक ह्या दर आठवड्याला मुलींना छोटे छोटे काम वाटून द्यायचे असं ठरवलं. यावेळी त्यांना किरण्याची यादी बनवायला लावली होती. एकीने घरात काय काय आहे ते बघायचं आणि मोठीने ते लिहून काढायचं.. सगळ्यात पहिले लहाने सांगितलं ताई भाकरीचे पीठ संपलेला आहे भाकरीचे पीठ पावशेर हवं लिहून ठेव. 😄 पुढची यादी अशी होती की शिरा करायला रवा लागतो आणि साखर पण लागते तर ती आहे की नाही ते डब्यात उघडून बघितलं गेलं..😄 मीठ नसलं तर भाजीला चव येत नाही म्हणून आधी मीठ आहे का घरात ते पण पाहिलं. त्या पुढची उडी गेली की घरामध्ये कोणत्या कोणत्या डाळी आहेत. मग सगळे डबे उघडले जो डबा भरलेला वाटला ती डाळ भरपूर आहे ती लिहायची नाही, मग कोणत्या डाळीचे काय नाव आहे, पुरण पोळी ला कोणती डाळ लागते, अशी त्यांनी त्यांच्यातल्या त्यांच्यात चर्चा केली. ☺️☺️ मग तिखटाचा डबा उघडला त्याच्यामध्ये नेमकी मोहरी संपलेली होती आणि बाकी सगळं होतं मग या महिन्यात फक्त मोहरीच लागणार आहे तेवढे लिहिली. आणि मग महत्त्वाचे गोष्ट त्याच्यात समाविष्ट केली त्यांनी ते म्हणजे क्रीमचे बिस्कीट आणि लॉलीपॉप. आधी पाच पाच लिहायचे ठरवले पण आई तेवढे खाऊ देणार नाही म्हणून मग त्याच्यापुढे संख्याच लिहिली नाही जेवढे आई अनिल तेवढे आपले 😅😅 अशाप्रकारे किराण्याची यादी त्यांनी केली. मग त्यानंतर आई एवढं सामान घेऊन ये अशी यादी माझ्या हातात दिली. जेव्हा ह्या महिन्याचं किराण्याचं कोणतं कोणतं सामान लागणार आहे याची यादी त्यांना दाखवली आणि मग ह्या महिना कोणते पूजा असेल किंवा घरात कधी पाहुणे येणार असतील किंवा काही सुट्ट्या असेल तर मग घरात काय काय वेगवेगळे पदार्थ करणार आहे त्याच्यानुसार यादीमध्ये थोडाफार कसा बदल होतो हे जेव्हा त्यांनी माझ्याकडून ऐकलं, तेव्हा मात्र दोघींना फार आश्चर्य वाटलं. मग पुन्हा तीच यादी घेऊन त्याच्यावर सॉरी लव यू आई असं म्हणून ती यादी मला पुन्हा दिली. बालमानसशास्त्रानुसार, मला मात्र हे अगदी पटलं की मुलांना खरोखर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्यायला हव्या. अर्थात ते काम परफेक्ट करू शकणार नाही परंतु काम कसं घडतं याची त्यांना ओळख तरी मिळायला हवी. डॉ मेघा अत्रे
👌 ❤️ 👍 7

Comments