Dilip Khatekar Official
February 2, 2025 at 12:37 AM
आज exam center वर वेळेत पोहचा.
तिथे पोहचल्यावर कोणाशीही जास्त बोलू नका, एकटे रहा, वाचत रहा, बिनकामाच्या ओळखी काढू नका.
काही डोक्यात जात नसेल तरी पुस्तकात डोकं राहूद्या.
Exam जवळ जवळ आली की अरे बापरे, काहीच कसं आठवत नाही मला, असं वाटायला लागत... ते नॉर्मल आहे. तुम्ही एकटेच नाही असं वाटणारे.
Exam हॉल मध्ये गेल्यावर हॉल मधील बेंच, फॅन, light, शिक्षक सर्वांना thank you बोला.
Exam हॉल मध्ये तुम्ही जेव्हा एकटे असतात, तेव्हा काही आठवायचा प्रयत्न नका करू, 10-15 min अगोदर नाही काही आठवणार, तेव्हा देवाचं नाव घेणे उत्तम पर्याय ❤️
पेपर हातात आल्यावर पहिल्या 30 सेकंदात सर्व पेपर व्यवस्थित बघा. Maths and Reasoning ला किती वेळ द्यायचा ते ठरेल तेव्हाच.
10-15 मिनिटांनी थोडं पाणी पिण्याचा ब्रेक घ्या.
पेपर cover करायचा आहेत. 100 प्रश्न visit झालेच पाहिजे.
यश तुमचेच असेल. द्या मस्तपैकी exam. All the best 🔥🔥🔥🔥
❤️
🙏
👍
😂
54