Dilip Khatekar Official
Dilip Khatekar Official
February 23, 2025 at 05:11 PM
Combine चा पेपर होता त्याचा, त्याला माहिती होत फक्त टिकून राहायचं शेवटपर्यंत, attempt केला व्यवस्थित की मार्क येतात, syllabus पूर्ण झालाच होता, टेस्ट पेपर पण भरपूर सोडवले होते. नातेवाईक म्हणत होते काय होत नसतं म्हणून याच, पण त्याने स्वतः वर विश्वास ठेवला आणि डिस्ट्रॅक्ट नाही झाला. एवढं सोपं असतं Combine पास होणं... त्या रिझवान ला विचारा, त्याने 2-4 current चे प्रश्न अवघड गेले तर काय विचार केला काय माहिती, त्याला वाटलं आता संपलं, घाई केली, हातचे मार्क वाया गेले, आक्खा गणित चुकला त्याचा. हेच होत, शेवटी विराट पास झाला, रिझवानला पण शक्य होत score करणे, पण त्याला pressure खूप होता, media रुपी नातेवाईकांकडून, गंडला बिचारा. होय, आता बिचाराच म्हणावं लागेल, हरला ना, कष्ट त्याचे पण आहेत, पण तो एक तास नाही खेळता आला ना त्याला. म्हणून कार्यक्रम झाला त्याचा. #सहजच सुचलेलं... ❤️
❤️ 👍 😂 😢 🙏 95

Comments