आपलं मानसशास्त्र
आपलं मानसशास्त्र
February 27, 2025 at 06:11 AM
लोकं आपल्याशी किती वाईट वागू शकतात हे आपल्यावर सुद्धा अवलंबून आहे. आपल्या स्वतःच्या मर्यादा, आत्मसन्मान आणि प्रतिसाद देण्याची पद्धत लोकांच्या वागणुकीला आकार देते. "सोशल लर्निंग थिअरी" नुसार, लोक आपल्याला जसे वागताना पाहतात, तसेच ते आपल्याशी वागण्याची शक्यता असते. जर आपण वारंवार अपमान सहन केला किंवा प्रत्येक वेळी शांत राहिलो, तर समोरच्यांना वाटते की ते आपल्याशी तसाच व्यवहार करू शकतात. तसेच, "सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी" या संकल्पनेनुसार, आपण स्वतःला कसे सादर करतो त्यावरून लोक आपल्याशी कसे वागतील हे ठरते. जर आपण आत्मविश्वासाने आपली मतं मांडली आणि योग्यवेळी स्पष्ट "नकार" दिला, तर लोक आपली किंमत ओळखतात. त्यामुळे, इतरांचे वागणे आपल्यावरही अवलंबून असते. आपली स्वीकृतीची मर्यादा निश्चित करणे आणि गरज असेल तेव्हा विरोध करणे हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ #sociallearning #selfesteem #rakeshvarpe #आपलंमानसशास्त्र
❤️ 👍 🌹 💯 14

Comments