खडकवासल्याचा कोलंबस
खडकवासल्याचा कोलंबस
March 1, 2025 at 06:34 AM
***विद्रोह*** लहानपणी घराच्या शेजारी म्हशींचा 🐃 गोठा होता. एक अवाढव्य माणूस म्हशींना चरायला 🌳 न्यायचा त्याच्या आकारामुळे त्याला आम्ही सगळे दारासिंग म्हणायचो. दारासिंग कायम दारूच्या 🍻 नशेत असायचा कुठल्याही म्हशीने येता-जाता रस्ता सोडला की दारासिंग च्या तोंडातून इरसाल शिवी 🤬 आलीच म्हणून समजा. आम्ही लहानपणी तिथेच आसपास खेळत 🤼 असायचो त्यामुळे गुरुवर्य दारासिंगांची ही अमृतवाणी कायम कानावर पडत असे. चांगल्या वाईटाची काहीच जाण नसलेले आम्ही 👶 ते ज्ञानबिंदू अलगत टिपले आणि आचरणात आणायला ही सुरुवात केली. एक दिवस असंच थंडी ताप भरला 🤒 म्हणून घरचे मला दवाखान्यात घेऊन गेले. माझी इंजेक्शन 💉बद्दलची भीती माहीत नसलेल्या डॉक्टर मॅडमने 🧑‍⚕️ मला इंजेक्शन दिले. त्या क्षणी एक तीव्र सणक डोक्यात गेली आणि गुरुवर्य दारासिंग यांच्या या पट्ट शिष्याने भरलेला ज्ञानाचा सगळा घडा रिकामा केला🤬🤬 आणि झकारांत शिव्यांची लाखोली वहायला सुरूवात केली. हे काय होतंय हे कुणाला कळायला मार्ग नव्हता. घरच्यांची मन शर्मेने खाली झुकली होती 🫣आणि मी माझ्या भावनांच्या आवेगाला वाट मोकळी करून पूर्णपणे रिता झालो🤐 घरी आल्यावर घरातल्या प्रत्येक सदस्याने मला कुत्र्यासारखा मारला😩 पुढे त्या डॉक्टर मॅडम मला एका मित्राच्या लग्नात दिसल्या त्यांचाही वय झालं होतं माझ्यातही बदल झाले होते सुदैवाने त्यांनी मला ओळखलं नाही😀😀 आज या घटनेला कमीत कमी 30 वर्षे झाली असतील. शिव्या देणे म्हणजे विद्रोह 🛀 हे आज मला समजलं
😂 1

Comments