
NCP
February 11, 2025 at 01:11 PM
नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि नांदेड येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री. प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
यावेळी मा. दादांनी जनकल्याणकारी ध्येय व धोरणांच्या आधारे लोकहित साधत कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला साथ देण्याचा निर्णय घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत अभिनंदन केले.
आगामी काळात सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर पक्ष संघटन आणखी मजबूत होईल, पक्षाच्या विचारधारेचा घराघरापर्यंत प्रचार-प्रसार होईल आणि पक्षाला अधिकाधिक यश प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली.
👍
❤️
6