
NCP
11.9K subscribers
Verified ChannelAbout NCP
Official WhatsApp Channel of Nationalist Congress Party
Similar Channels
Swipe to see more
Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टाची, विचारसरणीची कदर करणारा पक्ष आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब यांनी पुण्यातील ओबीसी सेलच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.

भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय हा पदं मिळवून सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे तर बहुजन समाजाचा व्यापक विकास करण्यासाठी घेतला होता, असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांनी पुण्यात पार पडलेल्या ओबीसी सेल व सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत व्यक्त केले.

राज्यातील प्रत्येक समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले महायुती सरकार अविरत प्रयत्नशील राहून सर्वांच्या हिताचे निर्णय घेत आहे. आज उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता, दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल एक टक्का निधी राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे दिव्यांगांच्या आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांसाठी हा विशेष निधी सुयोग्य रीतीने वापरण्यासाठी वित्त आणि नियोजन विभागाने मंजुरी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवादा’च्या निमित्ताने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, ज्येष्ठ नेते मा. श्री. हसन मुश्रीफ यांनी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी सर्वांच्या समस्या, अडीअडचणी आणि विविध मागण्या जाणून घेत त्याच्या निवारणासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

शिवरायांचा अवमान करणारी राहुल सोलापूरकर सारखी विकृती कायद्याच्या आधारे ठेचून काढली पाहिजे, असे ठाम मत प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांनी पुण्यातील राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद, शक्ती देत पक्ष संघटन अधिक मजबूत करणं आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं येत्या काळातील महत्त्वाचं धोरण आहे, असं मत प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनील तटकरे साहेब यांनी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.